Dear Lottery Free Home Delivery: खुशखबर! सरकारमान्य 'डियर लॉटरी' ची महाराष्ट्रात मिळणार मोफत घरपोच डिलिव्हरी, बंपर बक्षिसाची किंमत 5 कोटी
Dear Lottery (Photo Credits: YouTube)

असं म्हणतात आयुष्यात कुठलही सोंग घेता येईल मात्र पैशाचं सोंग कधीच घेता येणार नाही. कारण तुम्हाला तुमचे स्वत:चे घर, व्यवसाय सुरु करायचा असेल तर पैशाची गरज भासते. अशा वेळी सोप्या पद्धतीने पैसा मिळविण्यासाठी लोकांसाठी 'लॉटरी' (Lottery) हा पर्याय उपलब्ध करण्यात आला जेथे तुमच्या नशिबाने तुम्हाला साथ दिली तर तुम्ही करोडपतीही होऊ शकता. अनेकांना लॉटरी काढण्याची आवड असते. मात्र सध्या लॉकडाऊन (Lockdown) घराबाहेर पडता येत नसल्यामुळे अशा लोकांची चांगलीच निराशा झाली आहे. त्यामुळे त्यांच्या सोयीसाठी सुरु करण्यात आलेल्या सरकारमान्य 'Dear Lottery' ची आता महाराष्ट्रातील (Maharashtra) लोकांना घरपोच मोफत डिलिव्हरी (Free Home Delivery) करण्यात येणार आहे.

या डियर लॉटरीचे वैशिष्ट्य म्हणजे ही लॉटरी जिंकणा-या बंपर बक्षिसाची किंमत आहे तब्बल 5 कोटी. ऐकून धक्का बसला ना मात्र हे खरे आहे. याशिवाय रनर अप विजेते या लॉटरीमुळे लखपती होऊ शकतील.

हेदेखील वाचा- ऑनलाईन लॉटरी बंद होणार, यापुढे केवळ पेपर लॉटरी सुरु राहणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

डियर लॉटरी ही भारतातील लॉटरी क्षेत्रातील अग्रगण्य लॉटरी आहे. ज्याचे टर्नऑवर 2 अब्ज डॉलर्स इतके आहे. ही भारतातील प्रसिद्ध लॉटरीपैकी एक आहे. त्यामुळे लॉकडाऊन वा कोरोना व्हायरसचे सावट यावर पडू नये यासाठी या डियर लॉटरीची घरपोच मोफत डिलिव्हरी करण्यात येणार आहे.

1991 पासून ही लॉटरी भारतात आली. त्यानंतर त्याला देशातील अनेक राज्यांतून चांगला प्रतिसाद मिळाला आणि ती लोकप्रिय झाली. डियर लॉटरी ही भारतातील पहिली अशी लॉटरी आहे ज्याची सोडत टिव्हीवर लाईव्ह केली जाते. ही लॉटरी एशिा पॅसिफिक लॉटरी असोसिएशनची सदस्य सुद्धा आहे. त्यामुळे तुम्हाला जर ही लॉटरी खरेदी करायची असेल तर तुम्हाला त्यांनी दिलेल्या टोल फ्री क्रमांकावर कॉल करुन ती ऑर्डर करावी लागले. त्यानंतर तुमच्या दारी येऊन डिलिव्हरी बॉय ती लॉटरी देतील.