Dead Frog Found in Anganwadi Khichdi: पंढरपूरमध्ये शालेय पोषण आहारातील खिचडीत आढळला मेलेला बेडूक; पालकांकडून संताप व्यक्त
मात्र, पंढपूरमधून शासनाचा आंगणवाडी पोषण आहारातील ढिसाळ कारभार उघड झाला आहे.
Dead Frog Found in Anganwadi Khichdi: पंढरपुरात पोषण आहारात मृत बेडूक आढळला आहे. कासेगावच्या भुसेनगरमधला हा धक्कादायक प्रकार आहे. या अगोदर देखील कासेगावमध्ये शालेय पोषण आहारामध्ये मेलेला किडा आढळला होता. परंतु त्यावेळी पालकांनी दुर्लक्ष केले. आठवडाभरातच आता हा प्रकार समोर आला आहे. लहान मुलांना देण्यात येणारा खाऊ चार महिन्यांपूर्वी शाळेत आला होता. म्हणजे हे बेडकाचे पिल्लू त्याआधीच मरुन पडले होते. त्यामुळे खिचडीच्या कॉलिटीवर किती भरवसा ठेवला जाऊ शकतो. असा सवाल उपस्थित झाला आहे.
शालेय पोषण आहार हा आता विद्यार्थ्यांच्या जीवावर उठला आहे की काय अशी शंका या पोषण आहार पुरवठा करणाऱ्या ठेकेदारांच्या मानसिकतेमधून दिसत आहे. विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागण्यासाठी शासनाने अनेक योजना राबवल्या आहेत. त्यातील एक शालेय पोषण आहार ही योजना अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
जालन्यात पोषण आहारात अळ्या आढळल्या होत्या. जालन्यातील जाफराबाद तालुक्यातील डोणगाव केंद्रांअतर्गत येणाऱ्या सातेफळ येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शालेय पोषण आहारासाठी लागणाऱ्या भाजीपाल्यात अळ्या आढळून आल्यात. यावेळी गावातील ग्रामस्थानी ही बाब शाळेच्या मुख्यध्यापकांच्या निदर्शनात आणून देत त्यांना जाब विचारत चांगलच धारेवर धरलय.