दिल्लीतील स्फोटानंतर मुंबई, पुण्यासह राज्यात सुरक्षाव्यवस्था कडेकोट करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आदेश

दिल्लीच्या घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी ट्विट करुन नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहे.

Ajit Pawar Tweet (Photo Credits: Facebook)

नवी दिल्लीतील इस्त्रायली दूतावासाजवळ (Israel Embassy in Delhi) आज सकाळी स्फोट झाला. या स्फोटाने संपूर्ण दिल्ली शहर हादरून गेले. ज्या ठिकाणी स्फोट झाला त्या ठिकाणापासून इस्त्रायली दूतावास 150 मीटर अंतरावर आहे. या स्फोटाने देशातील अन्य राज्यातही सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. दरम्यान या स्फोटानंतर मुंबई (Mumbai), पुण्यासह (Pune) महाराष्ट्रात सुरक्षाव्यवस्था कडेकोट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दिल्लीच्या घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी ट्विट करुन नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या विषयी ट्विट करत म्हणाले आहेत की, "दिल्लीतील इस्त्रायली दूतावासाबाहेर झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री आणि पोलिस महासंचालकांशी चर्चा करुन राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. मुंबई, पुण्यासह राज्यात सुरक्षाव्यवस्था कडेकोट करण्याचे निर्देश दिले आहेत." तसेच राज्यातील जनतेनेही सतर्क राहून आपल्या आजूबाजूला संशयास्पद वस्तू अथवा हालचाल आढळून आल्यास पोलिसांना तात्काळ कळवावे असेही त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.हेदेखील वाचा- Minor Blast Near Israel Embassy in Delhi: दिल्लीतील इस्त्रायली दूतावासाजवळ आयडी स्फोट; कोणतीही जीवितहानी नाही

दिल्लीतील इस्त्रायली दूतावासाजवळ (Minor Blast Near Israel Embassy in Delhi) आयडी स्फोट झाला आहे. सुदैवाने या स्फोटात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दिल्लीत एपीजे अब्दुल कलाम रोडवर इस्राईली दूतावास आहे.

बॉम्बस्फोटाच्या बातमीने दिल्लीतील इस्त्रायली दूतावासाजवळ खळबळ उडाली आहे. या स्फोटात अनेक गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. इस्त्रायली दूतावासाजवळ उभ्या असलेल्या गाड्यांच्या काचा फुटल्या आहेत. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. स्फोटाच्या माहितीनंतर अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली.