Dawood Ibrahim's Home Auctioned: दाऊद इब्राहीम बालपणी राहात असलेल्या घरासह तीन मालमत्तांचा शुक्रवारी लिलाव
ही मालमत्ता रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील असून दाऊद आणि त्याच्या तीन कुटुंबीयांच्या मालकीची आहे.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim's Properties) बालपणी राहात असलेले घर आणि त्याच्या इतर मालमत्तांचा शुक्रवारी लिलाव होणार आहे. ही मालमत्ता रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील असून दाऊद आणि त्याच्या तीन कुटुंबीयांच्या मालकीची आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार आणि सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबके गावात असलेल्या या कृषी मालमत्तेला स्मगलर्स अँड फॉरेन एक्स्चेंज मॅनिप्युलेटर्स (फॉर्फीचर ऑफ प्रॉपर्टी) अॅक्ट (SAFEMA) अंतर्गत अधिकाऱ्यांनी जप्त केले आहे. जिचा लिलाव (Dawood Ibrahim's Properties Auction) केला जाणार आहे.
दाऊदशी जोडलेल्या मालमत्तांचा लिलाव:
दाऊद इब्राहिमशी असलेल्या त्यांच्या संबंधामुळे या मालमत्ता स्वतंत्रपणे विकण्याचा कुटुंबीयांचा प्रयत्न अयशस्वी झाला. साधारण 19 लाख रुपयांपेक्षा जास्त सामूहिक मूल्यमापन असलेले चार भूखंड लिलावाचा भाग आहेत. SAFEMA ने आता लिलावात एक पाऊल पुढे टाकण्याचा निर्णय घेतला आहे. 5 जानेवारी रोजी मुंबईत हा लिलाव होणार आहे, नोंदणीची अंतिम मुदत 3 जानेवारी आहे. (हेही वाचा, Dawood Ibrahim Dead? दाऊद इब्राहिम चा विषप्रयोगानंतर मृत्यू? मीडीया रिपोर्ट्स नंतर चर्चांना उधाण)
मागील लिलाव आणि मूल्यांकन:
गेल्या नऊ वर्षांत अधिकाऱ्यांनी दाऊद किंवा त्याच्या कुटुंबीयांच्या 11 मालमत्तांचा लिलाव केला आहे. त्यापैकी एक रेस्टॉरंट 4.53 कोटी रपये, सहा फ्लॅट्स 3.53 कोटी रुपयांना विकले गेले. तसेच, एक गेस्ट हाऊस 3.52 कोटी रुपयांना लिलाव करण्यात आले. (हेही वाचा, Dawood Ibrahim hospitalised in Karachi: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कराचीच्या रुग्णालयात दाखल .)
दाऊद इब्राहिमची पार्श्वभूमी:
दाऊद इब्राहिम हा 1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी आहे. 1983 मध्ये मुंबईत स्थलांतरित होण्यापूर्वी तो मुंबके गावात राहात होता. 1993 मध्ये झालेल्या विनाशकारी बॉम्बस्फोटानंतर (ज्यामध्ये 257 लोकांचा मृत्यू झाला) दाऊदने भारत सोडला. त्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या विनंतीवरून हे प्रकरण केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवण्यात आले.
1993 मुंबई मालिका बॉम्बस्फोट:
12 मार्च 1993 रोजी, मुंबई (तेव्हाचे बॉम्बे) बॉम्बस्फोटांच्या मालिकेने हादरली होती. स्फोटांमध्ये 257 लोकांचा मृत्यू झाला. 700 हून अधिक लोक जखमी झाले. यात अंदाजे 27 कोटी रुपयांच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाले. मुस्तफा डोसा आणि अबू सालेम यांच्यासह प्रमुख आरोपींना 16 जून 2017 रोजी या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले होते. दाऊद इब्राहिम या वॉन्टेड दहशतवादीने हल्ल्याची सूत्रे आखल्याचा आरोप आहे.
दरम्यान, दाऊद इब्राहीम याच्याबद्दल वर्तमानकाळात अनेक उलटसुलट बातम्या येत आहेत. काहींनी दावा केला आहे की, पाकिस्तानमध्ये त्याची हत्या झाली. काहींनी म्हटले आहे की, त्याचा काही काळापूर्वीच मृत्यू झाला. प्रसारमाध्यमांतून उलटसुलट बातम्या तर येत आहेत. मात्र, त्याला अधिकृत दुजोरा कोणत्याही अधिकृत संस्थांनी दिला नाही.