Davos World Economic Forum: दावोस येथे महाराष्ट्रातील गुंतवणुकीसाठी आतापर्यंत सुमारे 88,420 कोटी रुपये गुंतवणूकीचे सामंजस्य करार

आतापर्यंत सुमारे 88,420 कोटी रुपये गुंतवणूकीचे करार झाले असून, इतर प्रकल्पांबाबत संबंधित उद्योगांशी कराराची प्रक्रिया सुरु आहे. तसेच जपान बँकेसमवेत सुपा औद्योगिक वसाहतीसंदर्भात देखील चर्चा झाली.

Davos World Economic Forum (संग्रहित संपादित प्रतिमा)

स्वित्झर्लंड येथील दावोसमध्ये ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत पहिल्याच दिवशी, महाराष्ट्र राज्यामध्ये सुमारे 45,9000 कोटींची गुंतवणूक करण्यात आल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. सामंत म्हणाले, आज दावोस येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी आगमन झाले असून, त्यांनी दावोस येथे सज्ज असलेल्या महाराष्ट्र पॅव्हेलियन’ला भेट दिली.

महाराष्ट्र पॅव्हेलियनमध्ये राज्याच्या प्रगतीचे प्रभावी दर्शन घडवले जाणार असून महत्त्वाच्या उद्योगांसमवेत येथे सामंजस्य करारही केले जाणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज विविध कंपन्यांसमवेत सामंजस्य करार करण्यात आले असून, या माध्यमातून सुमारे 10,000 तरूणांच्या हाताला काम मिळणार असल्याची माहिती सामंत यांनी सांगितली. यावेळी, प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, एमआयडीसी मुख्य कार्यकारी अधिकारी विपिन शर्मा, टी. कृष्णा, श्रे एरेन, आशीष नवडे, स्टीफन व सर्व संबंधित उपस्थित होते. (हेही वाचा: Pune: मालमत्ता कर थकबाकीदारांवर PCMC करणार कारवाई, 100 गृहनिर्माण सोसायट्यांना पाठवली नोटीस)

यावेळी करण्यात आलेले सामंजस्य कारार-

Greenko energy Projects Pvt.Ltd- 12, 000 कोटींची गुंतवणूक

Berkshire Hathaway Home Services Orenda India- 16,000 कोटींची गुंतवणूक

ICP Investments/ Indus Capital- 16,000 कोटींची गुंतवणूक

Rukhi foods- 250 कोटींची गुंतवणूक

Nipro Pharma Packaging India Pvt. Ltd.- 1,650 कोटींची गुंतवणूक

मुख्यमंत्र्यांचे दावोस येथे आगमन झाल्यानंतर त्यांच्या हस्ते सुसज्ज अशा महाराष्ट्र पॅव्हेलियनचे उद्घाटनही करण्यात आले. या पॅव्हेलियनला भेट देऊन महाराष्ट्राविषयी जाणून घेण्यासाठी अनेक प्रतिनिधीनी गर्दी केली आहे. दरम्यान, अशा रितीने आतापर्यंत सुमारे 88,420 कोटी रुपये गुंतवणूकीचे करार झाले असून, इतर प्रकल्पांबाबत संबंधित उद्योगांशी कराराची प्रक्रिया सुरु आहे. तसेच जपान बँकेसमवेत सुपा औद्योगिक वसाहतीसंदर्भात देखील चर्चा झाली.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now