Davos World Economic Forum: दावोसमधील जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्राने दोन दिवसात केले 3,10, 850 कोटीचे सामंजस्य करार; राज्यात होणार 2 लाख रोजगार निर्मिती

हे सामंजस्य करार केवळ कागदावर न राहता त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी जलदगतीने करण्याचा आमचा भर आहे. गेल्या वर्षी दावोस येथे झालेल्या करारांपेक्षा यंदा अधिक गुंतवणुकीचे सामंजस्य करार होत आहेत, असे सांगतानाच उद्योगपूरक, कुशल मनुष्यबळ आणि झटपट निर्णय घेणारे लोकाभिमुख राज्य अशी महाराष्ट्राची प्रतिमा जगभरात असल्याचे याठिकाणी जाणवल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

Davos World Economic Forum: दावोसमधील जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्राने दोन दिवसात केले 3,10, 850 कोटीचे सामंजस्य करार; राज्यात होणार 2 लाख रोजगार निर्मिती
Davos World Economic Forum (संग्रहित संपादित प्रतिमा)

स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये सुरु असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत (Davos World Economic Forum) दोन दिवसांत महाराष्ट्राने ३ लाख १० हजार ८५० कोटीचे सामंजस्य करार केले असून उद्या ४२ हजार ८२५ कोटींचे करार होत आहेत. अशा रितीने ३ लाख ५३ हजार ६७५ लाख कोटींचे विक्रमी सामंजस्य करार करीत असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज समाज माध्यमांतून दिली. याव्यतिरिक्त १ लाख कोटींच्या गुंतवणुकीत उद्योगांनी स्वारस्य दाखवले असल्याने राज्यावर जागतिक उद्योग आणि गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी त्यांचे आभारही मानले आहेत. या करारांमुळे राज्यात २ लाख इतक्या मोठ्या संख्येने रोजगार निर्मिती होणार आहे.

हे सामंजस्य करार केवळ कागदावर न राहता त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी जलदगतीने करण्याचा आमचा भर आहे. गेल्या वर्षी दावोस येथे झालेल्या करारांपेक्षा यंदा अधिक गुंतवणुकीचे सामंजस्य करार होत आहेत, असे सांगतानाच उद्योगपूरक, कुशल मनुष्यबळ आणि झटपट निर्णय घेणारे लोकाभिमुख राज्य अशी महाराष्ट्राची प्रतिमा जगभरात असल्याचे याठिकाणी जाणवल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

दावोस परिषदेच्या पहिल्याच दिवशी म्हणजे १६ तारखेस ६ उद्योगांसमवेत १ लाख २ हजार कोटींच्या गुंतवणुकीचे करार करण्यात आले. त्यातून २६ हजार रोजगार निर्मिती होणार आहे. १७ जानेवारीस ८ उद्योगांशी २ लाख ८ हजार ८५० कोटींचे गुंतवणूक करार करण्यात आले. त्यातून १ लाख ५१ हजार ९०० रोजगार निर्मिती होईल. उद्या ६ उद्योगांशी ४२ हजार ८२५ कोटींचे करार होत असून त्यातून १३ हजार रोजगार निर्माण होतील असे मुख्यमंत्री म्हणाले. (हेही वाचा: Davos World Economic Forum: अदानी समूहाचे संस्थापक Gautam Adani यांची महाराष्ट्र दालनात भेट; CM Eknath Shinde यांच्यासोबत केली गुंतवणुकीच्या संधींवर चर्चा)

गुंतवणूक करार झालेल्या उद्योगांची माहिती व रोजगार पुढीलप्रमाणे-

१६ जानेवारी – आयनॉक्स एअर प्रोडक्ट २५ हजार कोटी (५ हजार रोजगार), बी सी जिंदाल ४१ हजार कोटी (५ हजार रोजगार), जेएसडब्ल्यू स्टील २५ हजार कोटी (१५ हजार रोजगार), एबी इन बेव्ह ६०० कोटी (१५० रोजगार), गोदरेज एग्रोव्हेट १००० कोटी (६५० रोजगार) अमेरिका स्थित डेटा कंपनी १० हजार कोटी (२०० रोजगार)

१७ जानेवारी – अदानी ग्रुप ५० हजार कोटी (५०० रोजगार), स्विस इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स ११५८ कोटी (५०० रोजगार), इंडियन ज्वेलरी पार्क ५० हजार कोटी (१ लाख रोजगार), वेब वर्क्स ५ह्जार कोटी (१०० रोजगार), लॉजिस्टिकमधील इंडोस्पेस,इएसआर, केएसएच, प्रगती, यांची मिळून ३५०० कोटी (१५ हजार रोजगार), नसर्गिक संसाधानातील कॉन्गलोमिरेट कंपनी २० हजार कोटी (४ हजार रोजगार)

महाप्रीत ने हरित उर्जा प्रकल्पांसाठी ५६ हजार कोटींचे करार केले-

अमेरिकास्थित प्रेडीक्शन्स समवेत ४ हजार कोटी, युरोपमधील हिरो फ्युचर एनर्जी मध्ये ८ हजार कोटी, जर्मनीच्या ग्रीन एनर्जी ३००० मध्ये ४० हजार कोटी, व्हीएचएम ओमान समवेत ४ हजार कोटी

१८ जानेवारीस पुढील सामंजस्य करार होतील-  सुरजागड इस्पात १० हजार कोटी (५ हजार रोजगार), कालिका स्टील ९०० कोटी (८०० रोजगार), मिलियन स्टील २५० कोटी (३०० रोजगार), ह्युंदाई मोटर्स ७ हजार कोटी (४ हजार रोजगार), कतारची एएलयु टेक समवेत २०७५ कोटी (४०० रोजगार), सीटीआरएल एस (ctr s) ८६०० कोटी (२५०० रोजगार)

(The above story first appeared on LatestLY on Jan 18, 2024 12:00 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).