Daughter-In-Law's Second Marriage: विधवा सुनेचे सासूकडून कन्यादान, पुणे येथील सकारात्मक घटना
यात सासूने पुढाकार घेतला आहे. छाया लायगुडे असे या सासूचे नाव आहे. सासू-सूनेच्या नात्यातील असणारी कटूता या सासू सुनांनी खास करुन सासूने संपवलीच नाही. तर, त्याला एक नवा आयामही दिला आहे.
पुणे (Pune) येथे परीवर्तनशील विचारांची नांदी पुन्हा एकदा पाहाला मिळाली आहे. यात सासूने पुढाकार घेतला आहे. छाया लायगुडे असे या सासूचे नाव आहे. सासू-सूनेच्या नात्यातील असणारी कटूता या सासू सुनांनी खास करुन सासूने संपवलीच नाही. तर, त्याला एक नवा आयामही दिला आहे. छाया लायगुडे यांनी आपल्या विधवा सुनेला कन्या मानत तिचा पुनर्विवाह (Daughter-In-Law's Second Marriage) करुन दिला आहे. इतकेच नव्हे तर स्वत:हून तिचे कन्यादानही करुन दिले आहे. सासूच्या या विचाराला छोटा मुलगा आणि सुनेने प्रतिसाद दिल्यानेच त्यांना हे पाऊल पुढे टाकता आले.
पुणे येथे राहणाऱ्या छाया लायगुडे यांचा मोठा मुलगा विशाल याचा प्रदीर्घ आजाराने मृत्यू झाला. विशाल याच्या पश्चात पत्नी (रश्मी), आई, आणि पाच वर्षंची मुलगी आहे. आता या सर्वांचे काय करायचे? सर्वांना सोबत घेऊन कशी वाटचाल करायची असा सवाल सासू छाया लायगुडे आणि असा प्रश्न पत्नी रश्मी याच्यासमोर होता. इतक्या लहान वयात सुनेला आलेले वैधव्य पाहून सासूच्या मनालाई वाईट वाटत होते. सुनेचे दु:ख त्यांना पाहावत नव्हते. सुनेच्या भविष्याच्या विचाराने त्यांचे मन कातर होत असे. त्यामुळे त्यांनी मग सुनेचा दुसरा विवाह लावून देण्याचा विचार केला. तसा निर्णयही घेतला. (हेही वाचा, प्रेमविवाह केला आहे? की करायचा आहे? जाणून घ्या फायदे तोटे)
अखेस सासूने वरसंशोधन सुरु केले. त्यांना सुनेला अनुरुप असा मुलगा मिळाला. त्यांनी सुनेला विश्वासात घेतले. स्वत:च कन्यादान केले आणि सुनेचा नवा संसार सुरु करुन दिला. सासूच्या या निर्णयाचा आणि कृतिचे पुणे जिल्ह्यात कौतुक होत आहे. सासू-सूनेच्या नात्याला नवा आयाम आणि परिमान मिळाल्याची भावना समाजातून व्यक्त होत आहे. तसेच, विधवा सुनेचे कन्यादान करणे ही बाब सुद्धा क्रांती घवणारी इतिहासात नोंद घेण्यासारखी आहे, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.