Darshana Pawar Murder Case : 'ह्या' धारधार शस्त्राने केला खुन, गळ्यावर सपासप वार करत दगड देखील घातला डोक्यात,
लग्नाचा नकार पचवू शकला नाही त्यामुळे राहुलने दर्शनाचा जीव घेतला.गळ्यावर सपासप वार करत दर्शनाचा खुन केला.
Darshana Pawar Murder Case: गेल्या काही दिवसांपासून राज्य दर्शना हत्याकांड प्रकरणाने हादरला आहे. दिवसेंदिवस ह्या हत्याकांड प्रकरणातील खुलासे हाेत आहेत. राहुल हंडोरे दर्शना हत्याकांड प्रकरणातील खुनीने नुकतेच पोलीसांकडे कबुलीजबाब दिल्याचे समोर आले आहे. लग्नाला नकार दिल्यामुळे राहुलला याचा राग आला आणि रागाच्या भराता त्यांच्याकडून हे कृत्य घडून गेल्याचे समोर आले आहे. एम पी एस सीच्या परिक्षेत दर्शना तिसरी आले होती. आणि याचदरम्यान तिचं लग्न दुसऱ्या सोबत होणार असल्याचे राहुलला समजले.
राहूलने राजगडावर खुन अश्याप्रकारे केला
ते दोघेही राजगडावर ट्रेकिंगला गेले होते त्यावेळी राहुल आणि दर्शना यांच्या दोघांत लग्नाविषयी चर्चा चालू असताना तीने लग्नाला नकार दिला. भंडाण चालू असातना राहुलने बॅगेतून करकट काढलं. राहुलने तिच्यावर कंपासमधील करकटने तिच्या गळ्यावर वार केला. तीन ते चार वेळा गळ्यावर वार केल्यानंतर तिच्या गळ्यातून रक्तस्त्राव चालू झाला याचदरम्यान राहुलने तिच्या डोक्यात मोठा दगड घातला.
मला दर्शनाला मारायचे नव्हते, परंतू रागाच्या भरात माझ्याकडून तिचा खुन झाला आहे. मला तीचा राग आला आणि हे पाउल उचलावे लागले. अशी कबुली आरोपी राहुलने पोलीसांत दिली आहे. मला तिच्या सोबत लग्न करायचे होते. लग्नासाठी तिच्या घरांना देखील विचारलं होते परंतु ते देखील ह्या लग्नासाठी नकार देत राहीले.
पुण्यातून पोलीसांनी ह्या प्रकरणाची चौकशी सुरु केली. पोलीसांनी त्याला पकडण्यासाठी पाच पथके बनवली. मुंबई, सिन्नर, लोणावळा, नाशिक आणि पुण्यात ह्या संदर्भात काटेकोरपणे चौकशी चालू केली. आणि अखेर पोलीसांनी आरोपी राहुला मुंबईतून पकडल.