Dangerous Buildings: पावसाळयाआधी मुंबईमधील अतिधोकादायक 21 इमारतींची यादी जाहीर; MHADA ने केले सर्वेक्षण (See List)
मुंबईमध्ये (Mumbai) दरवर्षी पावसामुळे घरांची, इमारतींची पडझड झाल्याच्या अनेक बातम्या कानी येत असतात. पावसाळ्यात इमारती कोसळून अनेक अपघातही घडले आहेत. या गोष्टी टाळण्यासाठी म्हाडाने (MHADA) कंबर कसली आहे.
बघता बघता राज्यात मॉन्सूनचे आगमन झाले आहे. मुंबईमध्ये (Mumbai) दरवर्षी पावसामुळे घरांची, इमारतींची पडझड झाल्याच्या अनेक बातम्या कानी येत असतात. पावसाळ्यात इमारती कोसळून अनेक अपघातही घडले आहेत. या गोष्टी टाळण्यासाठी म्हाडाने (MHADA) कंबर कसली आहे. नुकतेच म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे इमारतींचे पावसाळापूर्व सर्वेक्षण पूर्ण झाले. त्यानंतर आता अतिधोकादायक इमारतींची (Most Dangerous Buildings) यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये 21 उपकरप्राप्त इमारती अतिधोकादायक आढळून आल्या आहेत. मुंबईमध्ये म्हाडाच्या 14,755 जुन्या इमारती आहेत.
आताच्या या 21 धोकादायक इमारतींमध्ये मागील वर्षीच्या 10 अतिधोकादायक इमारतींचा समावेश आहे. मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी याबाबत माहिती दिली.
पहा धोकादायक इमारतींची यादी –
- इमारत क्रमांक 144, एमजीरोड,अ- 1163 (मागील वर्षीच्या यादीतील)
- इमारत क्रमांक 133 बी बाबुलाल टॅंक रोड, बेगमोहम्मद चाल
- इमारत क्रमांक 54 उमरखाडी, 1ली गल्ली छत्री हाऊस
- इमारत क्रमांक 101-111, बारा इमारत रोड, (मागील वर्षीच्या यादीतील)
- इमारत क्रमांक 74 निजाम स्ट्रीट, (मागीलvवर्षीच्या यादीतील)
- इमारत क्रमांक 123, किका स्ट्रीट (मागीलवर्षीच्या यादीतील)
- इमारत क्रमांक 166 डी मुंबादेवी रोड (मागील वर्षीच्या यादीतील)
- इमारत क्रमांक 2-4 ए, 2री भोईवाडा लेन,
- इमारत क्रमांक 42 मस्जिद स्ट्रीट
- इमारत क्रमांक 14 भंडारी स्ट्रीट (मागीलवर्षीच्या यादीतील)
- इमारत क्रमांक 64-64 ए भंडारीस्ट्रीट, मुंबई
- इमारत क्रमांक 1-3-5 संत सेना महाराज मार्ग
- इमारत क्रमांक 3 सोनापूर 2 री क्रॉस लेन
- इमारत क्रमांक 2-4 सोराबजी संतुक लेन ,
- इमारत क्रमांक 387-391,बदाम वाडी व्ही पी रोड (मागीलवर्षीच्या यादीतील)
- इमारत क्रमांक 391 डी बदाम वाडी,व्ही पी रोड (मागीलवर्षीच्या यादीतील)
- इमारत क्रमांक 273-281 फॉकलँड रोड, डी, 2299- 2301 (मागील वर्षीच्या यादीतील)
- इमारत क्रमांक 1, खेतवाडी 12 वी गल्ली (डी) 2049 (मागील वर्षीच्या यादीतील)
- इमारत क्रमांक 31 सी व 33 ए रांगणेकर मार्ग व 19 पुरंदरे मार्ग गिरगाव चौपाटी
- इमारत क्रमांक 104-106 मेघजी बिल्डिंग अ, ब व क विंग, शिवदास चापसी मार्ग
- इमारत क्रमांक 15-19 के. के. मार्ग व 1-3 पायस स्ट्रीट
मॉन्सूनच्या आधी इमारतीबाबत होणारे अपघात टाळण्यासाठी म्हाडाने अनेक उपाययोजना केल्या आहेत. इमारत धोकादायक असल्याची किंवा इमारतीबाबत काही समस्या असल्याची रहिवाशांची तक्रार असल्यास, तिचे निराकरण करण्यासाठी चार झोनमध्ये ठेकेदार नेमण्यात आले आहेत. या अतिधोकादायक इमारतींमध्ये 460 निवासी व 257 अनिवासी असे एकूण 717 रहिवासी/ भाडेकरू आहेत. (हेही वाचा: Mumbai High Tides Schedule 2021: मुंबईतील समुद्रात 'या' दिवशी उसळणार मोठ्या लाटा, IMD कडून वेळापत्रक जाहीर)
एखाद्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये इमारत रिकामी करावी लागलीच तर, महावीर नगर, कांदिवली येथे 135 संक्रमण शिबिरांची व्यवस्था करण्यात आली आहे.