Damadi Balbharati: बालभारती पाठ्यपुस्तकातील 'दमडी मराठी धडा' आजही चर्चेत, वाचा संपूर्ण पाठ

होय, परिचीत कसले स्मरणातच म्हणा ना. इयत्ता सहावीच्या वर्गात असताना शाळेत बालभारती (Balbharati) पाठ्यपुस्तकात शिकलेला हा एक धडा. आजही लोकांच्या स्मरणात आहे. जुन्या आठवणींना उजाळा म्हणून लोक 'दमडी मराठी धडा' असे इंटरनेटवर शोधत आहेत.

Damadi Balbharati | (Photo Credit - Facebook)

Damdi Marathi Dhada: दमडी, आज वयाच्या साधारण पस्तीशी ते चाळीशीत असलेल्या जवळपास प्रत्येक मराठी व्यक्तीला परिचित. होय, परिचीत कसले स्मरणातच म्हणा ना. इयत्ता सहावीच्या वर्गात असताना शाळेत बालभारती (Balbharati) पाठ्यपुस्तकात शिकलेला हा एक धडा. आजही लोकांच्या स्मरणात आहे. जुन्या आठवणींना उजाळा म्हणून लोक 'दमडी मराठी धडा' असे इंटरनेटवर शोधत आहेत. आजकालच्या नव्या मुलांना कदाचित कोण ही दमडी? असा प्रश्न पडू शकतो. पण, जर आजच्या मुलांनीही हा धडा वाचला तरी त्यांचेही मन हेलावून गेल्याशिवाय राहणार नाही. दमडी (Damdi) हे व्यक्तीचित्रणात्मक पात्र वाटले तरी मुळात ती एक कथा आहे. संपूर्ण धडा आपण येथे वाचू शकता.

मराठीतील प्रतिथयश लेखिका कुसुमावती देशपांडे (Kusumavati Deshpande Information) यांच्या 'मोळी' या कथासंग्रहातील दमडी ही एक कथा. जी तत्कालीन शालेय अभ्यासक्रम मंडळाने पाठ्यपुस्तकात घेतला. ज्यामुळे त्या वेळच्या विद्यार्थ्यांना मराठी साहित्य, व्यक्तीत्व आणि लहान मुलीच्या स्वप्नाचे एक चित्रण पाहायला मिळाले. ही कथा वाचली की मन मुळापासून हेलावून जाते. त्यातील उत्कटता मनाला भावून टाकते. (हेही वाचा, महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1981 pdf डाऊनलोड करा सोप्या पद्धतीने)

'दमडी' कथेच्या लेकिका या मराठीतील एक नामवंत लेखिका आहेत. त्यांचा जन्म अमरावती येथे 10 नोव्हेंबर 1904 रोजी आणि मृत्यू 17 नोव्हेंबर 1661 मध्ये झाला. त्या मराठी लेखिका होत्याच. त्यासोबतच त्या समालोचकही होत्या. त्यांनी मराठी कथालेखनामध्ये नवा प्रयोग आणला. मराठी लघुकथेला नवे रुपडे देण्याचा मानही त्यांना जातो. मराठी वाङमयात त्यांनी केलेल्या भरीव योगदानाबद्दल नेहमीच त्यांचे नाव आदराने घेतले जाते. कवी अनिल (आत्माराम रावजी देशपांडे) यांच्या त्या पत्नी होत्या. त्यांनी 1929 मध्ये कवी अनिल यांच्याशी विवाह केला. तो आंतरजातीय विवाह होता. या विवाहामुळे त्यांना समाजाचा प्रचंड विरोधही सहन करावा लागला.

'दमडी मराठी धडा' येथे वाचा

कुसुमावती देशपांडे यांची साहित्य संपदा- कुसुमानिल (कुसुमावती आणि पती अनिल यांच्यामधील पत्रांचा संग्रह), दीपकळी (१९३४), दीपदान (१९४०), दीपमाळ, पासंग (१९५४), मराठी कादंबरी (पहिले शतक) (१९५३), मोळी (१९४५). त्यांच्या साहित्यसंपदेला विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.