IPL Auction 2025 Live

Navi Mumbai: दलित आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट केल्याबद्दल Youtuber वर गुन्हा दाखल

ही घटना नवी मुंबई येथील आहे. कोपरखैरणे पोलिसांनी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

YouTube (PC - pixabay)

Navi Mumbai: दलित समाज आणि डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करणारा व्हिडिओ पोस्ट केल्याबद्दल  एका यूट्यूबरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना नवी मुंबई येथील आहे. कोपरखैरणे पोलिसांनी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यान्वये या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. (हेही वाचा- एल्विश यादवला दिलासा! न्यायालयाने एनडीपीएसचे दोन कलम हटवले)

मिळालेल्या माहितीनुसार, युट्यूबवर ९० सेकंदचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला. ज्यात जातीवादी अपशब्द वापरण्यात आले आणि दलित समाजाला अमानुष वागणूक आणि अस्पृश्यतेच्या प्रथेचे संदर्भात अपशब्द वापरले. ओम यादव असं युट्यूबरचे नाव आहे. ज्याने युट्यूबला अश्या पध्दतीचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओला अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहे. या प्रकरणी घणसोली येखील रहिवासी विक्रांत चिकणे यांनी ओम विरोधात तक्रार दाखल केली.

विक्रांत यांनी सांगितले की,  ओम यांच्या युट्यूब चॅनेलवर  1,89,000 सबस्क्राइबर्स आहेत.  युट्यूबरचा हा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हॉट्सअॅपद्वारे प्रसारित केला होता. त्याला त्याच्या मित्राने शेअर केला. व्हिडिओत त्याने कायदेशी व्यवस्थेला आव्हान दिले आहे.

पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. या प्रकरणाचा तपास वाशीचे अतिरिक्त पोलिस आयुक्त योगेश गावडे करणार आहेत. “आम्ही YouTube ला व्हिडिओ काढून टाकण्यासाठी निर्देशित करू. आम्ही अद्याप कंटेंट क्रिएटरचा शोध घेऊ शकलो नाही,” गावडे म्हणाले.