रेल्वेचा भोंगा ऐकून नाल्यात पडलेला पोलीस अधिकारी गंभीर जखमी, दहिसर येथील घटना
ज्याचा आवाज ऐकून हा पोलीस अधिकारी कथितरित्या दचकला आणि सुमारे 15 फूट नाल्यात कोसळा. ज्यामुळे तो जखमी झाला.
बेवारस आढळलेल्या मृतदेहाचा पंचनामा करताना झालेल्या अपघातात एक पोलीस अधिकारी गंभीर जखमी झाला आहे. मुकेश करात असे या अधिकाऱ्याचे नाव असल्याचे समजते. दहिसर (Dahisar) येथील भगवती रुग्णालय परिसरात हा मृतदेह रेल्वे पुलाखाली आढळून आला होता. या सध्या त्याला रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरु आहेत. मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजणेच्या सुमारास ही घटना घडली.
प्राथमिक माहितीनुसार, अचानक तीव्र आवाज ऐकल्याने दचकून खड्ड्यात पडलेल्या मुकेश खरात नामक अधिकाऱ्यास गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्या डोक्याला मोठा मार लगला असून शरीराचे इतर अवयवही दुखावले आहे. घटना घडल्यानंतर तो त्याची शुद्ध हरपली. त्याच अवस्थेत त्याला बोरिवली येथील करुणा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यास हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टर त्याच्या प्रकृतीवर बारीक लक्ष ठेऊन आहेत. मात्र, त्याची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
अधिक माहित अशी की, दहिसह पूर्व आणि पश्चिमेस जोडणाऱ्या फडके उड्डाणपुलाखाली एका व्यक्तीचा मृतदेह स्थानिक नागरिकांना आढळून आला. त्याची माहिती एम एच बी कॉलनी पोलिसांना फोनवरून म एच बी कॉलनी पोलिसांना फोनवरून मिळाली. प्राप्त माहितीच्या आधारे पोलीस तिथे दाखल झाले असता हा मृतदेह महिलेचा असल्याचे निष्पन्न झाले. कर्तव्यावर असलेल्या पोलीस उपनिरीक्षक खरात आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लागलीच मृतेहाचा पंचनामा करण्यास सुरुवात केली. पंचनामा पूर्ण झाला. पोलिसांनी सदर महिलेचा मृतदेही ताब्यात घेऊन तो पालिका रुग्णालयाकडे (भगवती) पाठविण्यात आला.
दरम्यान, पंचनामा पूर्ण करुन रुळावरुन परत जात असताना आलेल्या रेल्वेचा भोंगा जोरात वाजला. ज्यामुळे उड्डाणपुलाखाली खांबावर उभे असलेले पोलीस अधिकारी घरात हे गोंधळले. त्यातच त्यांचा तोल गेला आणि ते जवळपास पंधराफूट खोल खड्ड्यात पडले. खड्ड्यातील दगड धोंडे आणि तिक्ष्ण वस्तूंवर त्यांचे डोके आदळल्याने ते गंभीर जखमी झाले. सोबतच्या सहकाऱ्यांनी त्यांना खड्ड्यातून बाहेर काढत बोरिवली पश्चिमेकडील करुणा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या रुग्णालयात त्यांच्यावर प्राथमिक उपाचर करण्यात आले. त्यांना पुढील उपचारासाठी हिंदुजा रुग्णालयात दाखल केले गेले. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. अद्यापही ते शुद्धीवर आले नाहीत.