Dahi Handi 2019 Mumbai Traffic Advisory: जन्माष्टमी आणि दहीहंडी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर BEST Bus च्या निवडक मार्गामध्ये बदल; पहा बदललेल्या बेस्ट बसच्या मार्गाची यादी
दादर, पार्ले, ठाणे, वरळी भागात दहीहंडी साजरी केली जात आहे. या सोहळ्याचे स्वरूप पाहता बेस्ट बसने काही ठिकाणी आपल्या वाहतूक मार्गामध्ये (Best Bus Route) बदल केले आहेत. सुमारे 10 बेस्ट बसच्या मार्गांमध्ये आज बदल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
Mumbai Best Bus Route Advisory: मुंबईमध्ये आज गोकुळाष्टमी (Janmashtami) आणि दही हंडीचा (Dahi Handi) सण साजरा केला जात आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणामध्ये काही दिवसांपूर्वी आलेल्या महापूराने अनेकजण बेघर झाले आहेत. या ओल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर यंदा मुंबई आणि ठाण्यातील मानाच्या दहीहंड्या रद्द झाल्या असल्या तरीही पारंपारिक पद्धतीने दादर, पार्ले, ठाणे, वरळी भागात दहीहंडी साजरी केली जात आहे. या सोहळ्याचे स्वरूप पाहता बेस्ट बसने काही ठिकाणी आपल्या वाहतूक मार्गामध्ये (Best Bus Route) बदल केले आहेत. सुमारे 10 बेस्ट बसच्या मार्गांमध्ये आज बदल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. Dahi Handi 2019: मुंबईमध्ये मानाच्या अनेक दहीहंडी रद्द मात्र दादर, ठाणे परिसरात 'या' दहीहंडी नक्की पहायला मिळणार
आज दहीहंडीच्या निमित्ताने शालेय शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर नोकरदारांनाही सुट्टी आहे. त्यामुळे कामावर जाणार्या मुंबईकरांचे प्रमाण तुलनेत कमी आहे. मात्र उर्वरित मुंबईकरांना आणि गोविंदा पथकांना त्रास नको म्हणून बेस्ट बसने काही ठिकाणी पर्यायी मार्गाने बस चालवण्यात यावी असा निर्णय घेतला आहे.
बेस्ट बसच्या कोणत्या बस मार्गामध्ये बदल होणार ?
बेस्ट बसच्या ट्विटर अकाऊंटवरून देण्यात आलेल्या माहितीनुसार, बेस्ट बस क्रमांक 56, 430, 481,383,381,361,367,167,268,605 यांच्या वाहतूक मार्गामध्ये बदल करण्यात आले आहेत. दादर, ठाणे, भांडूप, अंधेरी या भागामध्ये चलवण्यात येणार्या या बेस्ट बसच्या मार्गामध्ये बदल करण्यात आले आहेत. दही हंडी निमित्त डॉ. काशिनाथ नाट्यगृह चौकातील वाहतूक मार्गात बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग
BEST Bus Transport ट्वीट
During #Gokulashtami #DahiHandi festival celebration today few roads will be restricted for traffic movement. Therefore few #bestbus route operation have been temporarily changed. #mumbaitraffic pic.twitter.com/5YvrOmNmBc
महाराष्ट्र्रात पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी यंदा दहीहंडीच्या भव्य रूपाला फाटा देण्यात आला आहे. त्याऐवजी महाराष्ट्रात सणाची परंपरा कायम रहावी आणि मुंबई, ठाणे परिसरातील महिला तसेच पुरूष गोविंदा पथकांमधील उत्साह कायम रहावा म्हणून काही मंडळांनी आणि आयोजकांनी पारंपारिक स्वरूपात सेलिब्रेशन करण्याचा निर्णय घेतला आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)