Dadar Railway Station Updated Platform Number: दादर रेल्वे स्टेशन फलाटाचे क्रमांक बदलले, मध्य आणि पश्चिम मार्गावरील प्रवाशांनो, घ्या जाणून

मध्य (Mumbai Central Railway Line) आणि पश्चिम रेल्वे (Mumbai Western Railway Line) मार्गावरुन प्रवाशांमध्ये निर्माण होणारा गोंधळ कमी करण्यासाठी हे बदल करण्यातत येणार आहे.

Dadar railway station | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

Dadar Railway Station Update: मुंबई शहरातील मध्यवर्थी ठिकाण असलेल्या दादर रेल्वे स्टेशनवर येत्या 9 डिसेंबरासून महत्त्वाचे बदल करण्यात येणार आहेत. मध्य (Mumbai Central Railway Line) आणि पश्चिम रेल्वे (Mumbai Western Railway Line) मार्गावरुन प्रवाशांमध्ये निर्माण होणारा गोंधळ कमी करण्यासाठी हे बदल करण्यातत येणार आहे. नव्या बदलानुसार पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या फलाटांना नवे क्रमांक दिले जाणार आहेत. प्राप्त माहितीनुसार दादर स्थानकावर सध्यास्थितीत 15 फलाट आहेत. त्यापैकी 1 ते 7 क्रमांकाचे फलाट मध्य रेल्वे मार्गासाठी तर 8 ते 15 क्रमांकाचे फलाट हे पश्चिम रेल्वे मार्गासाठी आहेत. या फलाटावरुन गाडी पकडताना दोन्ही मार्गांवरील प्रवाशांचा गोंधळ उडतो. त्यामुळे हा गोंधळ कमी करण्यासाठी रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.

गोंधळ होण्याचे कारण

दादर रेल्वे स्टेशनवर मध्य आणि पश्चिम मार्गावरुन जाणाऱ्या गाड्यांसाठी असलले फलाट क्रमांक सारखेच आहेत. शिवाय या स्टेशनवरुन पुणे, वडोदरा, नाशिक या दिशेने जाणाऱ्या गाड्यांचा थांबा आहे. मध्य रेल्वे विभागातील आठ फलाट आणि दीर्घ पल्ल्याच्या गाड्यांसाठी टर्मिनल फलाट आणि पश्चिम रेल्वे विभागासाठी सात फलाट आहेत. त्यामुळे प्रवाशांचा संभ्रम अधिकच वाढतो.

नेमका बदल काय?

पश्चिम रेल्वेवरील फलाट क्रमांक 1 ते 7 कायम राहतील. मात्र, मध्ये रेल्वे फलाटाचे क्रमांक मात्र 8 ते 14 असे करण्यात येणार आहेत. फलाट क्रमांक 1 चे नाव 8 करण्यात येणार आहे तर 2 क्रमांकाचा फलाट उंची वाढविण्यासाठी सोडण्यात आला आहे.

कसे असतील बदलते फलाट?

उपनगरीय प्लॅटफॉर्म क्रमांक 1 हा 8 म्हणून ओळखला जाईल

फलाट क्रमांक 2 रुंदी आणि उंची विस्तारासाठी सोडला जाईल (काम केले जाईल)

उपनगरीय प्लॅटफॉर्म क्रमांक 3 हा 9 म्हणून ओळखला जाईल

उपनगरीय प्लॅटफॉर्म क्रमांक 4 हा 10 म्हणून ओळखला जाईल

उपनगरीय प्लॅटफॉर्म क्रमांक 5 हा 11 म्हणून ओळखला जाईल

उपनगरीय प्लॅटफॉर्म क्रमांक 6 हा 12 म्हणून ओळखला जाईल

विद्यमान दादर टर्मिनस प्लॅटफॉर्म क्रमांक 7 हा 13 म्हणून ओळखला जाईल

विद्यमान दादर टर्मिनस प्लॅटफॉर्म क्रमांक 8 हा 14 म्हणून ओळखला जाईल

मध्य रेल्वेने काढलेली अधिसूचना आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर दिलेल्या माहितीनुसार, 9 डिसेंबर 2023 पासून नवे लागू केले जातील. रेल्वेने प्रवाशांच्या सोईसाठीच हे बदल केले असले तरी, प्रवाशांना ते कितीसोईचे वाटतात आणि त्याला प्रतिसाद कसा मिळतो हे नऊ डिसेंबर नंतर कळणार आहे.