Dada Bhuse vs Sanjay Raut: दादा भुसेंनी संजय राऊत यांच्या विरोधात ठोकला मानहानीचा दावा; राऊतांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश
संजय राऊत यांनी सामना पेपर मध्ये गिरणा सहकारी साखर कारखान्यामध्ये पालकमंत्री दादा भुसे यांनी 178 कोटी रूपयांचा शेअर घोटाळा केल्याचा मजकूर प्रसिद्ध केला आहे.
नाशिक चे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या विरोधात 'सामना' मध्ये बदनामीकारक आणि चूकीचा मजकूर प्रसिद्ध केल्याचं म्हणत खासदार आणि संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर मानहानीचा खटला दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मालेगाव कोर्टाने (Malegaon Court) संजय राऊत यांना न्यायालयामध्ये हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. चूकीचा मजकूर प्रसिद्ध केल्याचं सांगत मानहानीच्या अर्जावर खुलासा करण्यासाठी संजय राऊतांना हजर राहण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे.
दरम्यान संजय राऊत यांनी सामना पेपर मध्ये गिरणा सहकारी साखर कारखान्यामध्ये पालकमंत्री दादा भुसे यांनी 178 कोटी रूपयांचा शेअर घोटाळा केल्याचा मजकूर प्रसिद्ध केला आहे. हा मजकूर चूकीचा आणि बदनामीकारक असल्याचा दावा दादा भुसेंचा आहे. याप्रकरणी त्यांनी संजय राऊत यांच्यावर नाशिकच्या मालेगाव मध्ये अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला आहे. ज्येष्ठ विधीज्ञ सुधीर अक्कर यांच्या मार्फत दाखल केलेल्या या फौजदारी खटल्यात मंत्री दादा भुसे यांची जन सामन्यांमध्ये प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने दै.सामना या वर्तमानपत्रातून बदनामी केल्याने आरोप करण्यात आला आहे. नक्की वाचा: Dadaji Bhuse: '50 खोके एकदम ओके' म्हणत शेतकरी आक्रमक; मंत्री दादा भूसे यांच्या कार्यक्रमात राडा, काळे झेंडेही दाखवले .
शिवसेनेमधील उभ्या फूटीनंतर अनेकदा ठाकरे विरूद्ध शिंदे हा संघर्ष सुरू आहे. मे महिन्यात ठाकरेंच्या मालेगाव मधील सभेत बोलताना संजय राऊत यांनी गिरणा साखर कारखान्यात घोटाळा झाल्याचा आरोप करत दादा भुसेंवर अप्रत्यक्ष टीका केली होती. त्यानंतर सामना मधूनही संजय राऊत यांनी दादा भुसेंवर आरोप केला होता. या खटल्यासंदर्भात संजय राऊत यांना खुलासा करण्यासाठी आज ( 23 ऑक्टोबर ) मालेगाव येथील न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दसरा मेळावा तोंडावर असताना संजय राऊत हे आज स्वतः मालेगाव न्यायालयात हजर राहतात की, वकिलांमार्फत आपले म्हणणे मांडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सामना'मध्ये प्रसिद्ध झालेला मूळ लेख हा पुरावा म्हणून भुसे यांच्याकडून सादर करण्यात आला आहे.