Dabur Group On Mahadev Betting App Scam Allegations: डाबर ग्रुप, Burman कुटुंबाने घोट्याळ्यातील आरोप निराधार असल्याची दिली प्रतिक्रिया
महादेव अॅप चा मालक सध्या कोठडीत आहेत, त्यांच्यावर मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (Prevention of Money Laundering Act ) कथित मनी लॉन्ड्रिंगच्या तरतुदींखाली कारवाई करत अटक करण्यात आली आहे.
Dabur Group चे मालक बर्मन कुटुंबियांनी मुंबई पोलिसांनी FIR मध्ये Gaurav Burman, Mohit Burman यांच्या नावाचा समावेश केल्यानंतर आरोप फेटाळले आहेत. Mahadev betting app scam मध्ये डाबर चे संचालकांची नावं आल्याने खळबळ पसरली होती पण डाबर कडून हे आरोप निराधार आणि खोटे असल्याचे म्हटलं आहे.
"आमच्या सोबत FIR बाबत कोणतेही औपचारिक संभाषण झालेले नाही. आमच्याकडे मीडीया हाऊसेस कडून शेअर करण्यात आलेली FIR आली आहे." असं बर्मन कुटुंबियांच्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे. " FIR खोटा असून निराधार आहे. " Mahadev Betting App Case: मुंबई पोलिसांकडून Dabur Group Chairman Mohit V Burman, Director Gaurav V Burman यांच्याही नावाचा FIR मध्ये समावेश!
सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बनकर यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे 7 नोव्हेंबर रोजी एफआयआर नोंदवण्यात आला होता. बर्मन कुटुंबीयांनी आरोप केला आहे की एफआयआर "बर्मन कुटुंबाद्वारे Religare Enterprises Limited चे अधिग्रहण रोखण्याच्या प्रयत्नात स्वार्थातून उचललेले पाऊल असल्याचं म्हटलं आहे. “आम्ही स्पष्टपणे आरोप नाकारतो आणि ठामपणे विश्वास ठेवतो की सखोल चौकशी मध्ये आमची बाजू सत्याची असल्याचं समोर येईल. या आरोपांचे निराधार रूप देखील समोर येईल. आमचा विश्वास आहे की कायदेशीर प्रक्रिया आमच्या प्रतिष्ठेला कलंकित करण्याच्या या दुर्भावनापूर्ण प्रयत्नाचे खरे स्वरूप उघड करेल," असेही त्यांनी म्हटलं आहे.
मुंबई पोलिसांप्रमाणेच ईडी कडूनही बेकायदेशीर बेटिंग अॅप सिंडिकेटची चौकशी सुरू आहे. यापूर्वी छत्तीसगडमधील महादेव बुकवर छापा टाकला होता. विशेष म्हणजे, केंद्राने ईडीच्या विनंतीवरून महादेव अॅपसह 22 बेकायदेशीर बेटिंग प्लॅटफॉर्मवर ब्लॉक करण्याचे आदेश जारी केले आहेत.
महादेव अॅप चा मालक सध्या कोठडीत आहेत, त्यांच्यावर मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (Prevention of Money Laundering Act ) कथित मनी लॉन्ड्रिंगच्या तरतुदींखाली कारवाई करत अटक करण्यात आली आहे.