डबेवाल्यांसाठी होणार रेल्वे स्थानकाबाहेर सायकल स्टँडची सुविधा

डबेवाल्यांसाठी आता त्यांच्या सायकली उभ्या करण्यासाठी लवकरच रेल्वे स्टेशनच्या बाहेर सायकल स्टँडची सुविधा पालिका प्रशासन करुन देणार आहे.

मुंबईचा डबेवाला (फोटो सौजन्य-Wikimedia Commons)
मुंबईतल्या डबेवाल्यांची ख्याती सातासमुद्रापलीकडे जाऊन पोहचली आहे. तसेच त्यांच्या डब्याची चव घरच्या जेवणाची सतत आठवण करुन देते. मात्र डबेवाल्यांसाठी आता त्यांच्या सायकली उभ्या करण्यासाठी लवकरच रेल्वे स्टेशनच्या बाहेर सायकल स्टँडची सुविधा पालिका प्रशासन करुन देणार आहे.
मुंबईतल्या डबेवाल्यांची संख्या पाहता जवळजवळ ती लाखांच्या घरात आहे. तसेच हे डबेवाले नियमित चर्चगेट ते विरार आणि सीएसटी पर्यंत डबे पुरवण्याचे काम वेळच्या वेळी करत असतात. तसेच हे लोक आपल्या सायकलींवरुन सर्वत्र डबे पुरवतात. मात्र घाई-गर्दीच्या ठिकाणी या डबेवाल्यांना त्यांच्या सायकलींसाठी व्यवस्थित जागा मिळत नाही. त्यामुळे पालिका प्रशासनाने सायकल स्टँडच्या सुविधेचा प्रस्ताव समोर आणला आहे. तसेच या प्रस्तावाला मान्यता दिल्यावर डबेवाल्यांना सायकली उभ्या करण्यासाठी नियोजित जागा उपलब्ध होणार आहे.

तसेच डबेवाल्यांची ही समस्या दूर करण्यासाठी स्थानिक प्राधिकरण या नात्याने मुंबई महापालिकेने  या योजनेमध्ये पुढाकार घेण्याचे ठरविले आहे.