Cyclone Tauktae Impact: मुंबईत लॅन्ड होणार्या 3 विमानांना वळवलं; मुंबई एअरपोर्ट संध्याकाळी 6 वाजेपर्यंत बंद राहणार
मुंबई मध्ये तौकते चक्रीवादळाचा (Cyclone Tauktae) प्रभाव पाहता मुंबई एअरपोर्ट (Mumbai Airport) बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सकाळीआधी 11 ते 2 नंतर दुपारी 4 आणि आता संध्याकाळी 6 वाजेपर्यंत विमानतळ बंद राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. परिणामी आज (17 मे) मुंबईला येणारी इंडिगो (IndiGo) आणि स्पाईस जेटची (SpiceJet Flight) 3 विमानं वळवण्यात आली आहे. Cyclone Tauktae: आदित्य ठाकरे यांची बीएमसी कंट्रोल रुमला भेट, नागरिकांना घरीच सुरक्षीत थांबण्याचे आवाहन.
मुंबईकडे येणारं इंडिगो चं विमाण आज हैदराबादला वळवण्यात आले आहे. तर स्पाईस जेटचं एक विमान सुरत ला वळवण्यात आले आहे. आणि इंडिगो चं अजून एक विमान लखानऊ ला पुन्हा वळवण्यात आल्याची माहिती छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कडून देण्यात आलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे.
ANI Tweet
दरम्यान मुंबईपासून 165 किमी दूर असलेल्या तौक्ते चक्री वादळाचा मुंबईला थेट धोका नाही. मात्र सध्या ताशी 120 किमी वेगाने वाहणार्या वार्यामुळे महाराष्ट्राच्या किनारपट्टीला फटका बसला आहे. हवामान खात्याने आज मुंबई, ठाणे भागाला ऑरेंज अलर्ट आणि रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट दिला आहे. सध्या सोसाट्याच्या वार्यासह पाऊस बरसत असल्याने अनेक सखल भागामध्ये पाणी तुंबले आहे.