Cyclone Tauktae मध्ये अडकलेल्या Barge P305 मधून 184 लोकांची सुटका करुन INS Kochi मुंबईत दाखल (See Pics)
तौक्ते चक्रीवादळात अडकलेल्या Barge P305 मधील 184 नागरिकांची सुखरुप सुटका करण्यात आली असून या सर्वांना घेऊन आयएनएस कोची मुंबईत दाखल झाली आहे.
तौक्ते चक्रीवादळात (Cyclone Tauktae) अडकलेल्या Barge P305 मधील 184 नागरिकांची सुखरुप सुटका करण्यात आली असून या सर्वांना घेऊन आयएनएस कोची (INS Kochi) मुंबईत (Mumbai) दाखल झाली आहे. एएनआय (ANI) वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अद्याप काही लोक बेपत्ता असून त्यांचा शोध सुरु आहे. मुंबईपासून सुमारे 35-40 मैलावर Barge P305 भरकटले होते. "जहाज अत्यंत कठीण परिस्थितीत अडकले होते. मात्र घटनास्थळी पोहचताच आम्ही तेथील परिस्थितीचा ताबा घेतला," अशी माहिती आयपीएस कोची, कमांडिंग ऑफिसर कॅप्टन सचिन सिक्वेरा यांनी दिली आहे.
"साईटवरील इतरांसह आम्ही बर्ज आणि चालक दल यांना शक्य तितक्या चांगल्या साहाय्याने मदत केली. अजूनही मोहिम सुरु आहे. आमच्याकडे मोठ्या प्रमाणात नौदल युनिट्स साइटवर आहेत. माझे जहाज नुकतेच परत आले आहे. जवळपास 14 लोकांना वाचविण्यात आले आहे, जे माझ्या जहाजात आले आहेत," ते असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, क्रु मेंबर अमित कुमार कुशवाह यांनी सांगितले की, "बार्ज बुडत होता त्यामुळे मला समुद्रात उडी मारावी लागली. मी तब्बल 11 तास समुद्रात होतो. त्यानंतर नौदलाने आमची सुटका केली."
ANI Tweet:
एका क्रु मेंबरला तर या सर्व प्रसंग कथन करताना अश्रू अनावर झाले. तो म्हणाला की, 184 लोकांची आतापर्यंत सुटका झाली असून शोधमोहिम आणि बचाव कार्य अद्याप सुरु आहे. (Cyclone Tauktae Update: तौक्ते चक्रीवादळामुळे बाँम्बे हाय परिसरातील 'बार्ज पी-305' जहाजात अडकलेल्या 146 जणांची सुटका; 130 जण बेपत्ता)
बार्जमधून बॉम्बे हाय फील्ड्सजवळ बुडालेल्या 89 जणांचा शोध भारतीय नौदल (आयएन) आणि इंडियन कोस्ट गार्ड (आयसीजी) यांनी सुरु ठेवला आहे. दरम्यान, सोमवारी मुंबई आणि आपसपासच्या परिसरात तौक्ते चक्रीवादळाने प्रचंड धुमाकूळ घातला. त्यामुळे वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे काही ठिकाणी नुकसानही झाले.