Cyclone Nisarga Update: निसर्ग चक्रीवादळाचा जोर ओसरला; विदर्भ, मराठवाड्यात आज पावसाची शक्यता - हवामान खात्याचा अंंदाज

काल (3जून) दिवशी दुपारी कोकण किनारपट्टीजवळ रायगड जिल्ह्यातील अलिबाग जवळ निसर्ग चक्रीवादळ धडकलं होतं.

Cyclone Nisarga Update (Photo Credits: ANI)

भारतीय हवामान खात्याने आज (4 जून) दिलेल्या माहितीनुसार, निसर्ग चक्रीवादळाचा (Cyclone Nisarga) कमी दाबाचा पट्टा आता हळूहळू कमी क्षीण होत चालला आहे. महाराष्ट्रातील विदर्भ भागामध्ये आज पहाटे 5.30 च्या सुमारास डीप डीपरेशन मधून त्याचं रूपांतर डीप्रेशन मध्ये झालं आहे. आज संध्याकाळपर्यत त्याची वाटचाल उत्तर दिशेला होईल आणि या वादळाची तीव्रता कमी होईल. काल (3जून) दिवशी दुपारी कोकण किनारपट्टीजवळ रायगड जिल्ह्यातील अलिबाग जवळ निसर्ग चक्रीवादळ धडकलं होतं. Cyclone Nisarga Effect: निसर्ग चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टी भागात तडाखा; पहा वादळी वाऱ्यासह पावसाचे व्हिडिओ आणि फोटोज्.

प्राप्त माहितीनुसार, वादळाचा प्रभाव मध्य महाराष्ट्रमध्ये आहे. तर ते नोर्थ ईस्टच्या दिशेने प्रवास करत असून वार्‍याचा वेग हा 27 kmph आहे. सध्या मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सौम्य स्वरूपाचा पाऊस बरसेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर मराठवाडा, विदर्भ, दक्षिण मध्यप्रदेश या भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान वादळ पुढे सरकलं असलं तरीही कोकण, गोवा, दक्षिण गुजरात या भागात पावसाची दाट शक्यता आहे.

ANI Tweet 

दरम्यान रायगड जिल्ह्याला काल वादळाचा फटका बसल्यानंतर आता तेथील स्थानिकांचे, घराचे झालेले नुकसान पाहता एनडीआरएफच्या काही तुकड्या पाठवण्यात आल्या अअहेत. अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडल्याच्या, पत्रे उडाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. सध्या महाराष्ट्रामध्ये 20 एनडीआरएफच्या तुकड्या आहेत. त्यापैकी मुंबई आणि रायगडमध्ये 7-7 तुकड्या तैनात आहे. प्रशासनाकडून झालेल्या नुकसानीची पाहणी करून तात्काळ मदत पोहचवण्याचं काम सुरू केले जाणार आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif