Cyclone Asani: खवळलेल्या समुद्रात उलटली मच्छिमारांची बोट, पाहा व्हायरल व्हिडिओ
अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे.
असानी चक्रीवादळ पश्चिम बंगाल, ओडीशा (Odisha), बिहार, झारखंड, तेलंगणा, आंध्र प्रदेशसह इतर सहा राज्यांमध्ये आपला प्रभाव जोरदार दाखवताना पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. तर समुद्रकिनारपट्टीलगतच्या भागांमध्ये जोरदार वादळी वारे पाहायला मिळत आहे. दरम्यान, चक्रीवादळाचा इशारा दिला असतानाही समुद्रात मच्छिमारीसाठी गेलेल्या मच्छिमारांच्या बोटीला अपघात घडल्याची घटना पुढे आली आहे. सोशल मीडियावर (Social Media) या घटनेचा व्हिडिओही (Viral Video) जोरदार व्हायरल झाला आहे.
ओडिशा राज्यातील गंजम (Ganjam ) जिल्ह्यातील छत्रपूरजवळील (Chatrapur) आर्यपल्ली (Aryapalli) येथे ही घटना घडली. इथे खवळलेल्या समुद्रात मच्छिमारांच्या एका गटाची बोट उलटली. बोट किनाऱ्यालगतच उलटल्याने सर्व मच्छिमार पोहून किनाऱ्यावर पोहोचले आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही. (हेही वाचा, Cyclone Asani: असानी चक्रीवादळाचा 6 राज्यांना फटका, अनेक ठिकाणी विमानोड्डाण रद्द, मुसळधार पावासामुळे जनजीवन विस्कळीत)
ट्विट
दरम्यान, बंगालच्या खाडीत आलेले असानी चक्रीवादळ (Asani Cyclone) आता रौद्र रुपात बदलले आहे. या वादळाने मंगळवारी आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणम आणि तामिळनाडूच्या चेन्नई येथे अनेक विमानसेवा प्रभवीत केल्या आहेत. विशाखापट्टणम आंतरराष्ट्रीय विमानतळ (Visakhapatnam International Airport) निदेशक श्रीनिवास यांनी म्हटले की, इंडिगोने खराब हवामानामुळे येणाऱ्या आणि जाणाऱ्या अशा 23 विमानांचे उड्डाण रद्द केले आहे. त्यांनी म्हटले की, विशाखापट्टणम मध्ये खराब हवामानामुळे एअर एशियानेही चार उड्डाणे रद्द केली आहेत. चेन्नई विमानतळावरुनही हैदराबाद, विशाखापट्टण आणि जयपूर, मुंबईकडे जाणाऱ्या 10 विमानांचे उड्डाण रद्द झाले आहे.