CSMT Station: 'सीएसएमटी' रेल्वे स्थानक आता मॉल रुपात, मुंबईचा ऐतिहासिक वारसा घेणार नवे रुप
लवकरच याबाबत टेंडर काढले जाण्याची शक्यता आहे. हे टेंडर 1608 कोटी रुपयांचे असून या टेंडरची कालमर्यादा 60 वर्षे असल्याचे सांगितले जात आहे. म्हणजेच ही वास्तू 60 वर्षे भाडेतत्वावर करारपत्र करुन वापरण्यास दिली जाण्याची शक्यता आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्नमनस (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus) म्हणजेच सीएसएमटी (CSMT) ची वास्तू म्हणजे मुंबईचा वारसा सांगणाऱ्या अनक गोष्टींपैकी एक. गेली अनेक वर्षे ही वास्तू वास्तूशैलीचा उत्कृष्ट नमुना म्हणून दिमाखात उभी आहे. गेली अनेक वर्षे विशिष्ट रुपात दिसणारी ही वास्तू (Mumbai's Historic Building आता नव्या रुपात दिसणार आहे. लवकरच या वास्तूला आता एका मॉलचे स्वरुप येणार असल्याची चर्चा आहे. सीएसएमटी रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. त्यासाठी अदानी रेल्वेसह इतरही अशा 9 कंपन्या शर्यतीत असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे पुनर्विकासाचे हे टेंडर कोणत्या कंपनीला मिळते याकडेही अनेकांचे लक्ष लागले आह.
अदानी, गोदरेज, कल्पतरु पॉवर्स यांसारख्या कंपन्या सीएसएमटीचा पुनर्विकास करण्यास इच्छिक असल्याचे बोलले जात आहे. लवकरच याबाबत टेंडर काढले जाण्याची शक्यता आहे. हे टेंडर 1608 कोटी रुपयांचे असून या टेंडरची कालमर्यादा 60 वर्षे असल्याचे सांगितले जात आहे. म्हणजेच ही वास्तू 60 वर्षे भाडेतत्वावर करारपत्र करुन वापरण्यास दिली जाण्याची शक्यता आहे. (हेही वाचा, Mumbai's CST Makeover: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस च्या 1930 च्या आयकॉनिक रूपाला धक्का न लावता रूपडं पलटणार; भारतीय रेल्वेची 1600 कोटींची तरतूद)
खासगी वृत्तवाहीनी एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानसार, सीएसएमटी स्थानकाच्या दर्शनी भागात एक गॅलरी तयार करण्यात यईल. या गॅलरीत विमानतळावर देण्यात येणाऱ्या सुविधा दिल्या जातील. या कामास लवकरच सुरुवात होणार असल्याचेही या वृत्तात म्हटले आहे. या कामाचे कंत्राट कोणती कंपनी घेते आणि ती कंपनी संबंधित परिसराचा कायापालट कशी करते याचा उलघडा लवकरच होण्याची शक्यता आहे. दरम्यान, फलाट क्रमांक 18 वर आलल्या प्रवाशां