मुंबई- पुणे दरम्यान कोयना एक्सप्रेस सह या 6 एक्सप्रेस गाड्या 30 जानेवारी पर्यंत रद्द; पहा यादी
कोल्हापूर-सीएसएमटी कोयना एक्स्प्रेस (Koyna Express) मुंबई-पुणे (Mumbai- Pune) दरम्यान 30 जानेवारीपर्यंत रद्द राहणार आहे, मध्ये रेल्वेने याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे.
मध्य रेल्वेच्या (Central Railway) मंकी हिल (Monkey Hill) ते कर्जत (Karjat) दरम्यान घाटातील अप लाईन मार्गावर दुरुस्तीच्या कामानिमित्त घेण्यात आलेला ब्लॉक आणखीन काही दिवस कायम राहणार या ब्लॉक दरम्यान काही गाड्या रद्द करण्यात आल्या असून काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर, कोल्हापूर-सीएसएमटी कोयना एक्स्प्रेस (Koyna Express) मुंबई-पुणे (Mumbai- Pune) दरम्यान 30 जानेवारीपर्यंत रद्द राहणार आहे, म्हणजेच 30 जानेवारी पर्यंत कोयना एक्सप्रेसची फेरी ही पुणे स्थानकापासून कोल्हापूर अशी चालवण्यात येईल, याशिवाय पनवेल-पुणे- पनवेल, सीएसटी-पंढरपूर पॅसेंजर, सीएसटी बीजापूर-सीएसटी पॅसेंजर, दौंड-साईनगर शिर्डी-दौंड पॅसेंजर या गाड्या 30 जानेवारीपर्यंत रद्द राहणार आहेत.
प्राप्त माहितीनुसार, 21 जानेवारी ते 30 जानेवारी दरम्यान भुसावळ-पुणे-भुसावळ एक्सप्रेस ही मनमाड-दौंड या मार्गावरुन धावणार आहे. मध्ये रेल्वेने याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे तसेच प्रवाशांनी या काळात सहयोग करावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे. मुंबई-ठाणे-पुणे मार्गावर एसटी चालवणार 70 विशेष बस; मंकी हिल ते कर्जत दरम्यान मेगाब्लॉक च्या पार्श्वभूमीवर निर्णय
मध्य रेल्वे ट्विट
दरम्यान, मंकी हिल ते कर्जत या स्थाकातील कामांसाठी मागील वर्षीच 21 ऑक्टोबरला 10 दिवसांचा मेगा ब्लॉक घेण्यात आला होता. परंतु, या कालावधीत या मार्गावरील कामे पूर्ण झाली नाही. त्यामुळे पुढील महिनाभर म्हणजेच 30 नोव्हेंबरपर्यंत मंकी हिल ते कर्जतपर्यंत मेगा ब्लॉग पर्यंत पुढे ढकलण्यात आला. मात्र यानंतर सणाच्या आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून हा मेगाब्लॉक जानेवारी मध्ये नियोजित करण्यात आला होता.