CSMT Bridge Collapse: BMC कार्यकारी अभियंता अनिल पाटील यांनाही अटक, सहाय्यक अभियंता काकुळते यांना 5 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

एफ. काकुळतेला अटक करण्यात आली आहे.

Mumbai CSMT footover bridge Accident | (Photo Credits: ANI)

सीएसएमटी पूल दुर्घटनेमध्ये (CSMT Bridge Collapse) सहा जणांचा बळी गेल्यानंतर आता प्रशासन खडबडून जागं झालं आहे. या दुर्घटनेसाठी जबाबदार असलेल्या अधिकार्‍यांवर सध्या कारवाईचा बडगा उचलण्यास सुरूवात झाली आहे.  सोमवारी  (1 एप्रिल) रात्री सहाय्यक अभियंतांना अटक केल्यानंतर आज (2 एप्रिल)  संध्याकाळी मुंबई महापालिकेचे कार्यकारी अभियंता अनिल पाटील (Anil Patil) यांनादेखील अटक करण्यात आली आहे.

मुंबई पोलिसांनी महापालिकेचे सहाय्यक अभियंता एस. एफ. काकुळतेला सोमवारी रात्री अटक केली. त्याला आज कोर्टात हजर करण्यात आले होते. आज कोर्टाने काकुळतेला 5 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.सीएसएमटी पूल दुर्घटनेच्या प्रकरणात याआधी नीरजकुमार देसाईला अटक करण्यात आली आहे. सध्या पालिकेचे तीन अभियंता अटकेत आहेत.

सीएसएमटी स्थानकातील कल्याण दिशेकडील प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर उतरणारा पादचारी पूल प्रवाशांसाठी बंद करण्यात आला आहे. या पूलाच्या जिन्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे.