CSMT Bathroom Theft: मुंबई च्या सीएसएमटी स्टेशन वर 1.22 लाखांच्या वस्तू लंपास केल्याप्रकरणी 23 वर्षीय तरूण अटकेत; पोलिसांनी रंगेहात पकडलं
Mumbai Matterz या सोशल मीडीया पेजने ही बाब नजरेत आणली आणि रेल्वे प्रशासनाचं लक्ष वेधून घेतलं.
मध्य रेल्वेच्या Railway Protection Force कडून मुंबईच्या (Mumbai) सीएसएमटी स्टेशन (CSMT Station) वर सुमारे 1.22 लाखांच्या वस्तू लंपास केल्याप्रकरणी एकाला अटक केली आहे. अटकेत असलेला तरुण 23 वर्षीय आहे.तर मूळचा झारखंडचा (Jharkhand) आहे. सीएसएमटी स्टेशन मध्ये नव्याने सुरु केलेल्या एसी टॉयलेट (AC Toilet) मध्ये 1.22 लाखांचे टॉयलेट मधील काही फिटिंग्स गायब असल्याचं समोर आलं होतं. मध्य रेल्वेच्या अधिकार्यांनी MID Day ला दिलेल्या माहिती मध्ये Mohammed Owais असं ताब्यात असलेल्या मुलाचं नाव सांगितलं आहे. मोहम्मद हा झारखंड, रांची चा 23 वर्षीय तरूण आहे. त्याला बुधवारी (7 फेब्रुवारी) मध्यरात्री 1 च्या सुमारास रंगेहात पकडण्यात आलं आहे. दरम्यान सायन कोळीवाडा भागात येथे त्याने हे भाग विकायला आणले त्या दुकानदारादेखील पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं वृत्त आहे.
दरम्यान चोरी केलेल्या वस्तूंमध्ये जेट स्प्रे, नळ, काही प्रवासी आणि स्टाफ टॉयलेट्सचा समावेश आहे. तसेच Chief Public Relations Officer Dr Swapnil Nila यांच्या माहितीनुसार, आरोपी एसी टॉयलेट बंद असल्याने तेथे घुसू शकला नाही पण त्याने जुन्या टॉयलेट मध्ये जाऊन काही फिटिंग्स काढताना पकडण्यात आले.
प्रशासनाला जेव्हा वस्तू गायब होत असल्याचा संशय आला तेव्हा त्यांनी लक्ष ठेवून आरोपीचा ठावठिकाणा लावण्यासाठी सापळा रचला आणि त्याच्या मुसक्या आवळल्या. चोरीची सुरूवात शनिवारी रनिंग रूम पासून झाली. रनिंग रूम ही अशी जागा आहे जिथे गार्ड्स आणि ट्रेनचे चालक ब्रेक घेतात. आधी 8 बाईबकॉक्स, 9 स्टॉप कॉक्स, 2 जेट स्प्रे चोरीला गेले. सोमवारी 3 पिलरकॉक्स महिलांच्या स्वच्छतागृहामधून चोरीला गेले. अशाच प्रकारची चोरी पुरूषांच्या आणि एसी टॉयलेट्स मध्येही आढळली.
Mumbai Matterz या सोशल मीडीया पेजने ही बाब नजरेत आणली आणि रेल्वे प्रशासनाचं लक्ष वेधून घेतलं.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)