CSMIA Pre-Monsoon Maintenance Update: 9 मे दिवशी सहा तासांसाठी बंद राहणार मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरील दोन्ही रनवे
धावपट्टी 09/27 ही 3,448 मीटर x 60 मीटर आहे तर धावपट्टी 14/32 ही 2,871 मीटर x 45 मीटर पसरलेली आहे.
मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (Mumbai Airport) दोन रनवे 9 मे दिवशी सहा तासांसाठी बंद ठेवले जाणार आहेत. मान्सून पूर्व देखभालीच्या कामासाठी (Maintenance Work) हा रनवे बंद ठेवला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. दोन्ही रनवे सकाळी 11 ते संध्या काळी 5 वाजेपर्यंत बंद असतील अशी माहिती एअरपोर्ट ऑपरेटर MIAL कडून देण्यात आल्याचं एका जारी पत्रकामधून समोर आलं आहे.
Chhatrapati Shivaji Maharaj International Airport च्या रनवे वर मान्सून पुर्व कामांसाठी प्रायमरी रनवे 09/27 आणि सेकंडरी रनवे 14/32 हा बंद ठेवला जाणार आहे. या वेळेत रनवे च्या दूरूस्तीचं आणि देखभालीचं काम केले जाईल असं सांगण्यात आलं आहे. दरम्यान याबाबतची Notice to Airmen यापूर्वीच देण्यात आली होती. डिसेंबर महिन्यातच विमान कंपन्यांना याची माहिती देण्यात आली असून त्यानुसार विमानसेवा रिशेड्युअल करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. नक्की वाचा: Man Died At Mumbai Airport: व्हीलचेअर न मिळल्याने 80 वर्षीय वृध्दाचा मृत्यू, मुंबई विमानतळावरील घटना ( पाहा ट्वीट) .
मुंबई विमानतळावर रन वे, टॅक्सी वे आणि aprons चा भाग मिळून सुमारे 1033 एकरचा भाग आहे. रनवे देखभालीच्या कामामध्ये micro texture आणि macro texture झीज आणि नेहमीच्या वाहतूकीमुळे उद्भवलेल्या रनवेच्या पृष्ठभागाची तपासणी करणे आणि प्रकाशनानुसार एअरसाइड स्ट्रिप मजबूत करण्यात मदत करणे यांचा समावेश आहे.
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर रोज सुमारे 950 विमानांचा प्रवास होत असतो. धावपट्टी 09/27 ही 3,448 मीटर x 60 मीटर आहे तर धावपट्टी 14/32 ही 2,871 मीटर x 45 मीटर पसरलेली आहे.