Chhatrapati Sambhaji Nagar News: बलात्कारानंतर पिडीत तरुणीने घेतले विष, तर आरोपीने गळफास घेवून स्वत:ला संपवलं

या घटनेतनंतर पीडित तरुणीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

Representative Image

Chhatrapati Sambhaji Nagar News: छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. १९ वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्यात आला आहे. या घटनेतनंतर पीडित तरुणीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तरूण पीडितीने विष घेतलं, सद्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती मिळाली आहे. तर आरोपीने गळफास घेतल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मच्छिंद्र रामू घोडके (25)  असे आत्महत्या करण्याऱ्या तरुणाचे नाव आहे. तरुणीने बदनामी होईल याच भीतीचे तीनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.

जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात एका १९ वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्यात आला. तर या घटनेती आरोपीने गळफास घेवून आत्महत्या केली. या प्रकरणात सिल्लोड परिसराती ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीडित तरुणीच्या भावाला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. तरुणीची बदनामी होईल या भीतीने तीनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आरोपीवर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. ही माहिती तरुणाला कळताच, त्याने जिल्ह्यात बहिणीकडे असताना गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सिल्लोड परिसरातील पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली.

मिळालेल्या माहितीनुसार, तरुणाने पीडितेला भाड्याच्या रुमवर बोलावून बलात्कार केला. काही दिवसांपासून आरोपी तरुणीचा पाठलाग करत होता. आरोपीला ती आवडत असल्यामुळे तीला भेटण्यासाठी बोलवायचा. तुझ्या भावाला मारून टाकेन अशी धमकी देत तरुणीवर बलात्कार केला. बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यावर आरोपीने घरी कोणी नसताना गळफास लावून घेतला.

 



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif