Crime News: कर्जबाजारी झालेला पोलिसाने दोघांवर झाडल्या गोळ्या, अहमदनगर येथून आरोपीला अटक

ठाण्यातील भिंवडी परिसरातीस अंबाडी- वासिंद रस्त्यावर मोटरसायकलवरून आलेल्या दोघा तरुणावर गोळीबार करण्यात आला.

Gun Shot | Photo Credit - Pixabay

Crime News: ठाण्यातील भिंवडी परिसरातीस अंबाडी- वासिंद रस्त्यावर मोटरसायकलवरून आलेल्या दोघा तरुणावर गोळीबार करण्यात आला. या प्रकरणात मुंबई पोलिस दलातील सुरज देवराम ढोकरे याला अटक केली आहे. या प्रकरणात पडघा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मैंदे गावाजवळ ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुरज हे मुंबईतील नायगाव पोलिस हेडक्वॉटर्स येथे कार्यरत होते.

13 ऑक्टोबर रोजी सुरजने या दोघांर गोळी झाडली.रात्रीच्या वेळी फिरोज रफीक शेक आणि अजीम अस्लम सय्यद हे दोघेही मैंदे गावाजवळून जात असताना यांच्यावर गोळीबार केला. अशी माहिती पोलिसांनी माध्यमांना दिली. सुरज हे ऑनलाईन गेमिंगमुळे कर्जबाजारी झाले होते. कर्जाचे हप्ते फडण्यासाठी त्यांना पैशांचे गरज भासू लागली, डोक्यावर 40 ते 42 लाखांचे कर्ज असल्यामुळे त्याने चोरीचा मार्ग अवलंबल्याचे चौकशीत कबूल केले आहे.

चोरी आणि दरोड्याच्या उद्देशाने हा गुन्हा झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढला होता. पोलिसांनी कंबर कसून या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरु केला.  मुंबई पोलीसांनी हल्लेखोराला अहमदनगर पोलिसांच्या मदतीने शस्त्रासह ताब्यात घेतले. सरकारी पिस्टलमधून सय्यद यांच्यावर सहा, तर शेख यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या होत्या. आरोपी यापूर्वीही दोन वेळा भिवंडीत आल्याचे निष्पन्न झाले आहे. तेव्‍हा त्याने असे काही गुन्हे केले आहेत का, याचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.