Crime News: ऐरोलीत दारूड्या भावाचा दुर्दैवी अंत, बहिणीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
दारुड्या भावाचा बहिणींसोबत झालेल्या झटापटीत मृत्यू झाल्याची संतापजनक घडना घडली आहे.
Crime News: ऐरोलीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दारुड्या भावाचा बहिणींसोबत झालेल्या झटापटीत मृत्यू झाल्याची संतापजनक घडना घडली आहे. मुलगा आई वडिल आणि तीन बहिणींना सतत मारहाण करत असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. शैलेश रामचंद्र सोरटे असं मृत तरूणाचे नाव आहे. दारू पिऊन नशेत कुठेतरू पडून जखमी झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असवा अशी खोटी माहिती शैलेशच्या बहिणींनी पोलिस ठाण्यात दिली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी केलेल्या तपासात बहिणींसोबत झालेल्या झटापटीक शैलेश गंभीर जखमी झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी मृत तरुणाची मोठी बहिण ज्योती सोरटे हिच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. शैलेश कुटुंबासोबत ऐरोली सेक्टर १७ मधील अस्मिता सोसायटीमध्ये राहायचा. आई कुसुम सोरटे बहीण नीता सोरटे, ज्योती सोरटे व शिल्पा सोरटे यांच्यासह राहत होता.
माहितीनुसार, शैलेश काहीही काम- धंदा करायचा नाही. दारून पिऊन दररोज घरात भांडण करायचा. दारूच्या नशेत काहीही कारणांवरून आई- वडिलांना,तसेच तिन्ही बहिणींना अमानुषपणे मारहाण करायचा. ११ नोव्हेंबरच्या रात्री दारू पिऊन तो घरात भांडण करत होता. आईला आणि बहिणीला मारहाण करत असल्याने ज्योतीने त्याला रोखले पंरतु त्याने ऐकले नाही, ज्योतीने त्याला मागून येऊन पकडने डोक्याला मारले. तो गंभीर झाला आणि पडला.
पहाटे ४च्या सुमारास बहिणींनी बघितल्या तो निचपिच पडला होता. त्यामुळे त्यांनी लगेच शैलेशला शासकिय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर पोलिसांना ही घटना कळवण्यात आली. त्यानंतर कुटुंबियांनी पोलिसांना मृताची खोटी माहिती दिली.