Sandeep Deshpande Attack Case: संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ला प्रकरणी 2 जण ताब्यात; भांडूप परिसरातून क्राईम ब्रांच ची कारवाई
यामध्ये 7-8 जणांचा सहभाग असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याच्या प्रयत्नांनंतर दुसर्याच दिवशी या हल्ला प्रकरणी 2 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती देण्ययत आली आहे. भांडूप पश्चिम भागातून 2 संशयित पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. क्राईम ब्रांच कडून ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे आता या हल्लाप्रकरणी पुढे कोणती माहिती हाती लागणार याकडे मनसेचे लक्ष लागले आहे.
शिवाजी पार्क परिसरामध्ये काल सकाळी मॉर्निंग वॉकला गेल्या गेले असता त्यांच्यावर स्टंपने काही लोकांनी हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या हाता-पायाला दुखापत झाली आहे. हल्ल्यानंतर हिंदुजा हॉस्पिटल मध्ये त्यांना दाखल करून प्राथमिक चाचणी करून डिस्चार्ज करण्यात आले आहे.
संदीप देशपांडे यांच्या हल्ल्यानंतर मनसे चित्रपट सेनेचे अमेय खोपकर यांनी आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्या चौकशीची मागणी केली आहे. दरम्यान काल मनसे कार्यकर्त्यांनी या प्रकरणी शिवसेना भवनाबाहेरही घोषणाबाजी केली. आदित्य ठाकरे, वरूण सरदेसाई यांनी या हल्ला प्रकरणी आरोप फेटाळून लावले आहेत. Sandeep Deshpande Attack Case: संदीप देशपांडे यांच्यावरील सीसीटीव्ही फूटेज जारी; पोलिसांची 8 पथकं आरोपींच्या मागावर (Watch Video) .
पहा ट्वीट
संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ला प्रकरणी हत्येचा प्रयत्ना सारखे गंभीर गुन्हे अज्ञातांविरूद्ध दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये 7-8 जणांचा सहभाग असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.