Ganpati Festival 2021 Special Trains: बाप्पा पावला! मध्य रेल्वेकडून गणेशोत्सवानिमित्त विशेष गाड्यांची घोषणा, 8 तारखेपासून करता येणार बुकींग

मध्य रेल्वेने गणेशोत्सवानिमित्त विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. 05 सप्टेंबर ते 23 सप्टेंबरपर्यंत या ट्रेन धावणार आहेत.

Ganapati Festival Special Trains (Photo Credit: PTI and Pixabay)

Ganpati Festival 2021: गणेशोत्सवासाठी कोकणात जाऊ इच्छिणाऱ्या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वेने आनंदाची बातमी दिली आहे. मध्य रेल्वेने गणेशोत्सवानिमित्त विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. 05 सप्टेंबर ते 23 सप्टेंबरपर्यंत या ट्रेन धावणार आहेत. या काळात एकूण 72 गाड्या धावणार आहेत. मध्य रेल्वेकडून अधिकृत वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. सध्या करोनाचं विघ्न आल्याने गणेशोत्सवासाठी कोकणात जाऊ इच्छिणाऱ्या अनेक चाकरमान्यांची निराशा झाली होती. मात्र कोकण रेल्वेच्या या घोषणेमुळे त्यांना दिलासा मिळाला आहे.

गणपती उत्सव 2021 दरम्यान प्रवाशांची होणारी गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस / पनवेल आणि सावंतवाडी रोड / रत्नागिरी दरम्यान विशेष गाड्या चालवणार आहेत. गणेश भक्तांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे. हे देखील वाचा- Mumbai Local: मालगाडीचे इंजिन बंद झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प

1) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- सावंतवाडी रोड डेली स्पेशल- 36 ट्रिप (05.09.2021 ते 22.09.2021)

-01227 विशेष रेल्वे दरम्यान दररोज छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून मध्यरात्री 00. 20 मिनिटांनी सुटेल. तर, दुपारी 2 वाजता सावंतवाडी रोडे येथे पोहचेल.

-01228 विशेष रेल्वे सावंतवाडी रोड येथून दुपारी 2.40 मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी रवाना होईल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे 4.35 वाजता सीएसएमटी स्थानकावर पोहचेल.

स्थानक: दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिलपुन, सावर्दा, अरावली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, नांदगाव रोड, सिंधुदुर्ग आणि कुडाळ.


2) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- रत्नागिरी विशेष- 10 फेऱ्या (06.09.2021 ते 20.09.2021)

- 01229 विशेष रेल्वे छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून (केवळ सोमवार, शुक्रवार) दुपारी 13.10 मिनिटांनी सुटेल . तर, रात्री 10.35 वाजता रत्नागिरी रोडे येथे पोहचेल.

- 01230 विशेष रेल्वे रत्नागिरी येथून (केवळ रविवार, गुरुवार) रात्री 11.30 मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी रवाना होईल. त्यानंतर रात्री 8.20 वाजता सीएसएमटी स्थानकावर पोहचेल.

स्थानक: दादर, ठाणे (केवळ 01229 साठी), पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिलपुन, सावर्दा, अरावली रोड आणि संगमेश्वर रोड,


3) पनवेल- सावंतवाडी रोड विशेष- 16 फेऱ्या (07.09. 2021 ते 22.09. 2021)

- 01231 विशेष रेल्वे पनवेल येथून (केवळ बुधवार, गुरुवार, शनिवार) सकाळी 08.00 वाजता सुटेल. तर, त्याच दिवशी रात्री 8.00 वाजता सावंतवाडी येथे पोहचेल.

- 01232 विशेष रेल्वे रत्नागिरी येथून (केवळ बुधवार, गुरुवार शनिवार) रात्री 08.45 मिनिटांनी पनवेलसाठी रवाना होईल. त्यानंतर सकाळी 7.10 वाजता पनवेल स्थानकावर पोहचेल.

स्थानक: रोहा, माणगाव, वीर, खेड, चिलपुन, सावर्दा, अरावली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडावली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, नांदगाव रोड, सिंधुदुर्ग आणि कुडाळ.


4) पनवेल-रत्नागिरी बाय-विक्ली विशेष- 10 फेऱ्या (09.09.2021 ते 23.09.2021)

- 01233 विशेष रेल्वे पनवेल येथून (केवळ गुरुवार, रविवार) सकाळी 08.00 मिनिटांनी सुटेल . तर, दुपारी 3.40 वाजता रत्नागिरी रोडे येथे पोहचेल.

- 01234 विशेष रेल्वे रत्नागिरी येथून (केवळ सोमवार, शुक्रवार) रात्री 11.30 मिनिटांनी पनवेलसाठी रवाना होईल. त्यानंतर सकाळी 6.00 वाजता सीएसएमटी स्थानकावर पोहचेल.

स्थानक: रोहा, माणगाव, वीर, खेड, चिलपुन, सावर्डा, अरावली रोड आणि संगमेश्वर रोड.

या विशेष गाड्यांची बुकींग येत्या 8 तारखेपासून बुकींग सुरू होणार आहे. तर, सर्व पीआरएस केंद्रांवर आणि www.irctc.co.in वेबसाइटवरून तिकीट बूक करता येणार आहे.