COVID19 Vaccination: मुंबईत महाविद्यालयातील 1 लाख विद्यार्थ्यांपैकी फक्त 4 हजार जणांनी घेतला लसीचा डोस

त्यानुसार, 12,772 जणांचे राज्यातून लसीकरण झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यापैकी 3920 विद्यार्थी मुंबईतील होते.

Covid 19 Vaccination | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

राज्यभरात सोमवारी विद्यार्थ्यांसाठी खास लसीकरण अभियान आयोजित करण्यात आले होते. त्यानुसार, 12,772 जणांचे राज्यातून लसीकरण झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यापैकी 3920 विद्यार्थी मुंबईतील होते. लसीकरणावेळी 28 हजार जण त्यामध्ये सहभागी होतील अशी अपेक्षा होती. तसेच राज्यभरातील 5 हजार महाविद्यालये ही उच्च आणि तंत्रज्ञान शिक्षण विभाग आणि अन्य इंस्टिट्युटचे मिळून 18 वर्षावरील 40 लाख विद्यार्थी आहेत.(Covid-19 Update in Mumbai: आज मुंबई मधील कोरोना रुग्णसंख्येत घट; 300 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त)

काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने खास विद्यार्थ्यांसाठी युवा स्वास्थ अभियान सुरु केले जाणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार महाविद्यालयाच्या परिसरात लसीचे डोस दिले जाणार असून त्यासाठी 25 ऑक्टोंबर पासून सुरुवात झाली आहे. तर मुंबईतील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची लसीकरणाची आकडेवारी पाहता 50 हजार जणांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. तसेच 1 लाख विद्यार्थ्यांपैकी फक्त 70 हजार जणांचे पूर्ण लसीकरण झाले आहे.

उच्च शिक्षण विभाग मंत्री उदय सामंत यांनी टाइम्स ऑफ इंडियाला म्हटले की, जवळजवळ 60 टक्के विद्यार्थ्यांचे लसीकरण झाले असावे. या लसीकरणात 5-7 लाख विद्यार्थ्यांचे लसीकरण व्हावे अशी अपेक्षा असल्याचे ही सामंत यांनी म्हटले.(पुणे: प्लॅटफॉर्म तिकिटाच्या दरात तात्पुरती वाढ; 25 ऑक्टोबरपासून नवे दर लागू)

मुंबई युनिव्हर्सिटीकडून लसीकरणाची मोहिम राबवण्यात आली होती. त्यानुसार16 महाविद्यालयातील 3920 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. पण लसीकरणाचा आकडा पुढील काही दिवसात वाढेल असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. काही महाविद्यालयात दुसऱ्या वर्षाच्या परीक्षा सुरु आहेत. त्यामुळे त्यांना लसीकरणाच्या मोहिमेत सहभागी होता येत नसल्याचे सरकारी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.