COVID-19 Update: महाराष्ट्रात 84 नवे कोरोना रुग्ण, मुंबईत सर्वाधिक 32 कोविड संक्रमितांची नोंद
महाराष्ट्रात 30 मे रोजी महाराष्ट्रात 84 नवीन कोविड-19 रुग्णांची नोंद झाली, ज्यामध्ये मुंबईत सर्वाधिक 32 रुग्ण आढळले. राज्यात आता 467 सक्रिय रुग्ण आहेत. आरोग्य विभागाने नागरिकांना घाबरू नये असे आवाहन केले आहे.
Maharashtra COVID-19 Cases: कोविड-19 विषाणू महाराष्ट्रात पुन्हा एकदा आढळून येऊ लागला आहे. कोरोनाव्हायरस (Coronavirus) नावाने प्रचलित असलेल्या या विषाणूने संक्रमित 84 नव्या रुग्णांची नोंद महाराष्ट्रात झाली आहे. यामध्ये सर्वाधिक 32 कोरोना रुग्ण हे मुंबई (Mumbai COVID Spike) शहरात आहेत. तर त्याखालोखाल पिंपरी-चिंचवडमध्ये 19 आणि ठाण्यात 14 रुग्ण आढळले आहेत. अर्थात हे रुग्ण आढळले असले तरी त्यातील अनेक रुगण हे आगोदरपासूनच विविध शारीरिक व्याधिंनी ग्रासलेलेही (COVID Deaths with Comorbidities) आहेत. त्यानंतर झालेल्या चाचणीत त्यांना कोविड झाल्याचे आढळून आले आहे. दरम्यान, राज्यातील एकूण सक्रिय COVID-19 रुग्णांची संख्या आता 467 वर (जानेवारी 2025 पासून) पोहोचली आहे.
मे महिन्यात मुंबईत 405 रुग्णांची नोंद
जानेवारी 2025 पासून मुंबईत एकूण 411 COVID-19 रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे, यातील 405 रुग्ण केवळ मे महिन्यात नोंदवले गेले आहेत, ज्यामुळे रुग्णसंख्येत अचानक वाढ झाल्याचे स्पष्ट होते. (हेही वाचा, Maharashtra Covid-19 Update: कल्याणमधील एका महिलेच्या निधनानंतर मुंबईत कोविड-19 मृतांची संख्या 5 वर; महाराष्ट्रात 66 नवीन रुग्णांची नोंद)
नागरिकांनी घाबरू नये – राज्य आरोग्य विभाग
राज्यात सध्या ILI (इन्फ्लूएंझा सदृश आजार) आणि SARI (गंभीर तीव्र श्वसन संसर्ग) सर्वेक्षण सुरू आहे, जे COVID-19 रुग्ण ओळखण्यासाठी केले जात आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे. 'सध्या आढळणाऱ्या रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे दिसून येत आहेत. राज्यात पर्याप्त चाचणी व उपचार सुविधा उपलब्ध आहेत. नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही,' असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
जानेवारीपासून सात रुग्णांचा मृत्यू, सर्वांना पूर्वीचे गंभीर आजार
राज्यात जानेवारी 2025 पासून आतापर्यंत सात रुग्णांचा COVID-19 मुळे मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाने स्पष्ट केले की, हे सर्व रुग्ण पूर्वीच गंभीर आजारांनी ग्रस्त होते.
मृत रुग्णांचे तपशील पुढीलप्रमाणे:
- पहिल्या रुग्णास हायपोकॅल्सेमिक झटक्यांसह नेफ्रोटिक सिंड्रोमने ग्रस्त होता
- दुसऱ्या रुग्णाला कॅन्सर होता
- तिसऱ्याला स्ट्रोक (सेरेब्रोव्हॅस्क्युलर डिसीज) आणि झटके येत होते
- चौथ्याला डायबेटिक किटोॲसिडोसिससह खालच्या श्वसन मार्गाचा संसर्ग (LRTI) झाला होता
- पाचव्या रुग्णाला ILD (इंटरस्टिशियल लंग डिसीज) होता
- सहाव्या रुग्णाला मधुमेह होता आणि तो 2014 पासून पक्षाघातग्रस्त होता
- सातवी रुग्ण महिला होती, वय 47 वर्षे, जिने ताप व श्वास घेण्यास त्रास अशी तक्रार केली होती
राज्य सरकार सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेत राहावी, पण घाबरण्याची गरज नाही, असे आवाहन करण्यात आले आहे. सुरुवातीला कोरोनाबद्दल नागरिकांच्या मनात प्रचंड भीती होती. हळूहळू ही भिती निघून गेली आहे.
(The above story first appeared on LatestLY on May 31, 2025 09:35 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

