COVID19: पिंपरी चिंचवड महापालिका इमारतीत नागरिकांना प्रवेश बंदी; नगरसेविका, प्रभाग कार्यलयातील कर्मचाऱ्यासह पालिका परिसरातील एका बँक कर्मचाऱ्यालाही कोरोनाची लागण

राज्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण हे मुंबई आणि पुण्यात आढळून आले आहेत. ज्यामुळे मुंबई, पुणे येथील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण महाराष्ट्राला (Maharashtra) हादरून सोडले आहे. राज्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण हे मुंबई आणि पुण्यात आढळून आले आहेत. ज्यामुळे मुंबई, पुणे येथील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. यातच पुणेकरांच्या चिंतेत आणखी भर घालणारी माहिती समोर आली आहे. नगरसेविका, प्रभाग कार्यलयातील कर्मचारी आणि पालिका परिसरातील बँक कर्मचाऱ्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. ज्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिका (Pimpri Chinchwad Municipal Corporation) इमारतीत नागरिकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पालिका इमारतीत वाढू नये, यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका मुख्य कार्यालयात महानगरपालिकेशी संबंधित कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांना बंदी घालण्यात आली आहे. ज्या नागरिकांना कार्यालयात येणे आवश्यक आहे, अशा लोकांना संबंधित विभागातील अधिकाऱ्यांची लेखी पुर्वपरवानगी घेणे गरजेचे आहे. तसेच मुख्य कार्यालयात दुपारी 4 ते 6 च्या दरम्यान येणे बंधनकारक असणार आहे. महत्वाचे म्हणजे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील अनेकांना कोरोनाची लागण होत असल्याचे समजत आहे. तसेच महानगरपालिका कार्यालयामधील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनाही कोरोनाचा संसर्ग होत असल्याचे निदर्शनास आलेले आहे. हे देखील वाचा-Coronavirus In Pune: पुण्यात मागील 24 तासांत सर्वाधिक 823 कोरोनाबाधित रूग्ण; एकूण रूग्ण संख्या 15, 004 पार!

ट्वीट-

पुणे शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी प्रशासनाकडून ठोस पाऊले उचलली जात आहेत. मात्र, अद्यापही कोरोनाबाबत सकारात्मक बदल दिसून आला नाही. ज्यामुळे नागरिकांमध्ये भितीजनक वातावरण पाहायला मिळत आहे. तसेच महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुक्त होणाऱ्या संख्येतही वाढ होत आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.