COVID19 3rd Wave: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत रुग्णसंख्या सर्वाधिक वाढण्याचा धोका, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या यंत्रणांना सुचना
अशातच आता राज्यातील विविध ठिकाणी लॉकडाउनचे निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. मात्र आता पुन्हा एकदा नागरिकांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.
COVID19 3rd Wave: राज्यात सध्या कोरोनाची दुसरी लाट आली असून गेल्या काही दिवसांपासून रुग्णांचा आकडा कमी होताना दिसून येत आहे. अशातच आता राज्यातील विविध ठिकाणी लॉकडाउनचे निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. मात्र आता पुन्हा एकदा नागरिकांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. त्यानुसार कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत रुग्णांचा आकडा सर्वाधिक वाढण्याचा धोका व्यक्त करण्यात आला आहे. या संदर्भातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व यंत्रणांना सुचना दिल्या आहेत.(COVID19 Vaccination: मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! 84 दिवसांऐवजी आता 28 दिवसांनी दिली जाणार लस पण 'या' अटींचे पालन करावे लागणार)
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका पाहता आधीपासूनच त्या बद्दलची तयारी करण्यास राज्य सरकारने सुरुवात केली आहे. तर शहरी आणि ग्रामीण भागात पुरेशा प्रमाणात औषधांचा साठा आहे की नाही ते पहावे अशी सुचना दिली आहे. त्याचसोबत टास्क फोर्समधील डॉक्टर्स, वरिष्ठ अधिकारी यांच्यामध्ये सुद्धा एक बैठक पार पडली आहे. टास्क फोर्सच्या डॉक्टरांना सिरो सर्वे करण्यासह मोठ्या प्रमाणात लसीकरण पार पडण्यावर भर देण्यास सांगितले आहे. पण जर गर्दी वाढण्यासह नियमांचे उल्लंघन झाल्यास अवघ्या दोन महिन्यात आपल्याकडे तिसरी लाट येईल अशी भीती उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.
तर कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी काही सुविधांची कमतरता भासली. पण दुसऱ्या लाटेवेळी त्यामध्ये अधिक वाढ करण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु अवघ्या कमी वेळातच कोरोनाच्या रुग्णांचा आकडा दुप्पट पटीने वाढत असल्याचे दिसून आले. पण यामध्ये लढाई कायम राहिली आणि यामधून आपण खुप काही शिकलो असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. पण आता कोरोनाची तिसरी लाट आल्यास पुन्हा एकदा रुग्णांचा आकडा दुप्पटीने वाढण्याची शक्यता आहे. याधीच स्पष्ट करण्यात आले आहे की, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका लहान मुलांना बसणार आहे. त्यामुळे अगोदर पासूनच त्यांची काळजी घेण्याचे वेळोवेळी आवाहन करण्यात आले आहे. त्याचसोबत लहान मुलांसाठी एक टास्क फोर्स सुद्धा प्रथमच तयार करण्यात आल्याचे काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांनी म्हटले होते. (ग्रामीण भागात कोविड लसीकरण - गैरसमज आणि तथ्ये)
दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाचे आणखी 10,107 रुग्ण आढळले आहेत. तर 10,567 जणांना डिस्चार्ज दिला गेला असून गेल्या 24 तासात 237 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे राज्यात अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा 1,36,661 वर पोहचाल आहे. तसेच एकूण कोरोनाच्या रुग्णांची आकडेवारी 59,34,880 आहे.