Vaccination In Maharashtra: राज्यात लसीकरणाचा वेग मंदावण्याची शक्यता; 45+ च्या Covaxin दुसर्या डोससाठी राज्य सरकार 18-44 वयोगटातील लसी वळवणार- राजेश टोपे
त्याच्या तुलनेत साठा कमी असल्याने आता आरोग्यमंत्र्यांनी काळजी व्यक्त केली आहे.
भारतामध्ये लसींच्या तुटवड्यामुळे आता पुन्हा लसीकरणाचा वेग मंदावण्याची शक्यता आहे. आज महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिलेल्या माहितीनुसार, वय वर्ष 18-44 साठी राज्य सरकारने विकत घेतलेला कोवॅक्सिनचा (Covaxin) डोस आता 45 वर्षांवरील आणि दुसर्या डोससाठी पात्र असलेल्या नागरिकांना दिले जाणार आहे. 5 लाख लोकं सध्या कोवॅक्सिनच्या दुसर्या डोससाठी प्रतिक्षेमध्ये आहेत. त्याच्या तुलनेत साठा कमी असल्याने आता आरोग्यमंत्र्यांनी काळजी व्यक्त केली आहे.
दरम्यान भारतामध्ये 45 वर्षांवरील लसीकरणाचा कार्यक्रम हा केंद्र सरकार तर 18 -44 वर्षाच्या नागरिकांचे लसीकरण राज्य सरकार करत आहेत पण सध्या केंद्राकडे महाराष्ट्राला अधिकचे डोस देण्यासाठी साठा नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. राजेश टोपे यांनी लसीचा पुरवठा नियमित करण्यासाठी प्रयत्न करावेत यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याशी बोलणं झाल्याचंदेखील म्हटलं आहे. यावेळेस कोवॅक्सिन, कोविशिल्ड सोबत रशियाच्या स्फुटनिक वी लसीबाबत बोलताना त्यांनी राज्य सरकारकडून ऑफर लेटर पाठवलं आहे पण अद्याप दराबाबत आणि शेड्युल बाबत चर्चा झाली नसल्याचं म्हटलं आहे.त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद आल्यानंतर ग्लोबल टेंडर अंतर्गत लसी विकत घेतल्या जातील असे ते म्हणाले आहेत.
लसीसोबतच आज राजेश टोपे यांनी म्युकरमायसोसिस साठी आवश्यक औषधं उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. तसेच ऑक्सिजन साठा वाढवणं आणि रेमडीसीवीर यांचा साठा वाढवण्यासाठी देखील प्रयत्न केले जाणार आहे असे म्हटलं आहे. यावेळेस हाफकीनला देखील 1 लाख इंजेक्शन निर्मितीच्या निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू झालं आहे. (Maharashtra Lockdown Update: महाराष्ट्रात लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्याची शक्यता? येत्या मंत्रिमंडळात होणार चर्चा).
महाराष्ट्रात कालपर्यंत देण्यात आलेल्या माहितीनुसार, 1 कोटी 80 लाख 88 हजार 042 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. दि.9 मे 2021 रोजी 3718 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून 110448 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले.