Covid-19 Third Wave: 'या' महिन्यात येऊ शकते कोविड-19 ची तिसरी लाट; अजित पवार यांचा इशारा
त्यामुळे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र तिसऱ्या लाटेचे संकट अद्याप कायम आहे. सष्टेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता टाक्स फोर्सने वर्तवली आहे.
कोरोना व्हायरसची दुसरी लाट (Coronavirus Second Wave) मंदावत आहे. त्यामुळे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र कोविड-19 च्या तिसऱ्या लाटेचा (Covid-19 Third Wave) धोका अद्याप कायम आहे. सष्टेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता टाक्स फोर्सने वर्तवली आहे, अशी माहिती अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली आहे. बारामती मधील कोरोना आढावा बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. (Covid-19 Third Wave: देशात ऑगस्ट महिन्यात येणार कोरोनाची तिसरी लाट; ऑक्टोबरमध्ये रुग्णसंख्या शिगेला- Reports)
बारामती मधील कोरोना आढावा बैठकीत कोरोनाची संसर्गाची सद्यस्थिती, प्रशासनाच्या वतीनं करण्यात येणाऱ्या उपाययोजना, लसीकरण, बालकांसाठी वैद्यकीय सुविधा, ऑक्सिजनची उपलब्धता याबाबत चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर बारामती शहर आणि ग्रामीण भागात सोयी सुविधा उपलब्ध करुन देणं आवश्यक असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
अजित पवार ट्विट्स:
तसंच पहिला डोस घेतलेल्यांना प्रथम प्राधान्य द्या, लसीकरणाचं नियोजन करा, सर्व रुग्णालयात ऑक्सिजन बेड्सची व्यवस्था सुनिश्चित करणे असे निर्देश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचनाही अजित पवार यांनी दिल्या. नागरिकांनी मास्क वापरावा,सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही याबाबतची दक्षता घ्यावी, असं आवाहन त्यांनी केलं आहे.