IPL Auction 2025 Live

Coronavirus: महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती चिंताजनक; विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य

राज्यात कोरोनाची स्थिती चिंताजनक आहे. ही स्थिती बदलण्यासाठी राज्यातली आरटीपीसीआर टेस्ट (RTPCR Test) संख्या वाढली पाहिजे, तरच महिनाभरात ही परिस्थिती बदलेले, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

BJP Leader Devendra Fadnavis | (Photo Credits: IANS)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्य सरकारच्या कामगिरीवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहेत. राज्यात कोरोनाची स्थिती चिंताजनक आहे. ही स्थिती बदलण्यासाठी राज्यातली आरटीपीसीआर टेस्ट (RTPCR Test) संख्या वाढली पाहिजे, तरच महिनाभरात ही परिस्थिती बदलेले, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाचा विळखा घट्ट होताना दिसत आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. राज्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण मुंबईत आढळून आले होते. मात्र, मुंबई सध्या नियंत्रणात आली आहे. परंतु, इतर जिल्ह्यातील कोरोनाची संख्या मोठ्या झपाट्याने वाढताना दिसत आहे.

पडवे येथील वैद्यकीय महाविद्यालयात शासकीय व्हायरल चाचणी केंद्राचे लोकार्पण देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. राज्यात कोरोनाशी न लढताच कोरोनाशी संख्या कमी करण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्र देशात कोरोनाचा हॉटस्पॉट ठरले आहे. देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आढळून येत आहेत. तसेच राज्यातील मृतदरही सर्वाधिक आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण राज्यात कमी आहे. ही बदलण्यासाठी राज्यातील आरटीपीसीआर टेस्ट संख्या वाढली पाहिजे, तरच महिन्याभरात ही परिस्थिती बदलेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. हे देखील वाचा- Coronavirus: भाजप आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्यासह परिवारातील 6 सदस्यांना कोरोना विषाणूची लागण

देवेंद्र फडणवीस यांचे ट्वीट-

महाराष्ट्रात रविवारी संध्याकाळपर्यंत आणखी 12 हजार 248 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 390 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 5 लाख 15 हजार 332 वर पोहचली आहे. यापैंकी 17 हजार 757 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 3 लाख 51 हजार 710 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.