Lockdown: ठाण्यातील 16 भागांमध्ये 31 मार्चपर्यंत कडक लॉकडाऊन; येथे पाहा कोरोना हॉटस्पॉट्सची यादी
राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत होणारी वाढ चिंताजनक आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रशासनाकडून कठोर पावले उचलली जात आहेत.
महाराष्ट्रात (Maharashtra) पुन्हा एकदा कोरोना (Coronavirus) डोके वर काढले आहे. राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत होणारी वाढ चिंताजनक आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रशासनाकडून कठोर पावले उचलली जात आहेत. दरम्यान, ठाणे (Thane) शहरातील काही भागात कोरोनाचा प्रसार झपाट्याने होताना दिसत आहे. याचपार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने (Thane Municipal Corporation) महत्वाचा निर्णय घेतला आहे. तसेच शहरातील कोरोना हॉटस्पॉट असलेल्या भागात कडक लॉकडाऊन करण्याचा आदेश ठाणे महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांनी काढले आहेत.
महाराष्ट्रात कोरोना अटोक्यात येत असल्याने राज्य सरकारने टप्प्याटप्याने लॉकडाऊन शिथिल करण्यात सुरुवात केली होती. मात्र, राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई-पुण्यासह मराठावाडा आणि विदर्भातील अनेक शहरांमध्ये कोरोनाचा प्रसार वाढला आहे. हे देखील वाचा- Asangaon Fire: ठाण्यातील आसनगाव मध्ये प्लॅस्टिक फॅक्टरीला भीषण आग; 12 फायर इंजिन घटनास्थळी दाखल
ठाणे शहरातील हॉटस्पॉटची यादी-
1) आई नगर, कळवा
2) सूर्या नगर, विटावा
3) खरेगाव हेल्थ सेंटर
4) चेंदणी कोळीवाडा
5) श्रीनगर
6) हिरानंदानी इस्टेट
7) लोढा माजीवाडा
8) रुणवाल गार्डन सिटी, बालकुम
9) लोढा अमारा
10) शिवाजी नगर
11) दोस्ती विहार
12) हिरानंदानी मिडोज
13) पाटील वाडी
14) रुणवाल प्लाझा, कोरेस नक्षत्र, कोरेस टॉवर
15) रुणवाल नगर, कोलबाद
16) रुस्तोमजी, वृंदावन
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने तोंडावर मास्क घालणे, सोशल डिस्टिन्सिंगचे पालन आणि वारंवार हात धुवायला पाहिजे, असे वारंवार सरकारकडून आवाहन केले जाते. एवढेच नव्हेतर, या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई देखील केली जात आहे.