Nawab Malik On Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात बनावट नोटांचा धंदा; नवाब मलिक यांचा खळबळजनक आरोप

राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात बनावट नोटांचा धंदा (Counterfeit Notes Business in Maharashtra) सुरु होता, असा खळबळजनक आरोप मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला आहे.

Nawab Malik On Devendra Fadnavis | (Photo Credit: Archived, edited, representative images)

राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात बनावट नोटांचा धंदा (Counterfeit Notes Business in Maharashtra) सुरु होता, असा खळबळजनक आरोप मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला आहे. नोटबंदी (Counterfeit Notes) काळात अवघ्या देशामध्ये 2000 आणि 500 रुपयांच्या बनावट नोटा पकडल्या गेल्या. तामिळनाडू आणि पंजाब राज्यांमध्ये याविरोधात कारवाई होत होती. महाराष्ट्रात मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या संरक्षणामध्ये बनावट नोटांचा धंदा तेजीत होता, असा अत्यंत खळबळजनक आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

देशात 8 नोव्हेंबर 2016 या दिवशी नोटबंदी झाली. त्यानंतर देशात अनेक राज्यांमध्ये बनावट नोटा पकडण्यात आल्या. महाराष्ट्रात मात्र 8 ऑक्टोबर 2016 पर्यंत एकही बनावट नोट पकडण्यात आली नाही. 8 ऑक्टोबर 2017 या दिवशी महाराष्ट्रात 14 कोटी 56 लाख रुपयांच्या नोटा पकडण्यात आल्या. मात्र, हे प्रकरण दबण्यासाठी फडणवीस यांनी मदत केली. या बनावट नोटांचं नेक्सस दाऊद, बांग्लादेश आणि पाकिस्तानपर्यंत असल्याचेही नवाब मलिक यांनी म्हटले. (हेही वाचा, Nawab Malik Tweet: 'अब चैन खोने का वक़्त आ गया है' नवाबे मलीक यांचे सूचक ट्विट; आजच्या पत्रकार परिषदेबाबत उत्सुकता)

बनावट नोटांंप्रकरणी इम्रान आलम शेख नामक एका व्यक्तीस अटक झाली. पुणे येथून रियाज शेख याला अटक झाली. नवी मुंबईतूनही एकाला अटक झाली. मात्र, पुढे 14 कोटी रुपयांच्या जप्त करण्यात आलेल्या नोटांना 8 लाख 80 हजार रुपयांचे प्रकरण दाखवून दाबण्यात आले. पाकिस्तानातून पुरवल्या जाणाऱ्या नोटा भारतात सुरु राहव्यात यासाठीच हे प्रयत्न सुरु होते का? असा सवालही मलिक यांनी उपस्थित केला.

बनावट नोट प्रकरणात गुन्हे दाखल झाल्यावर लगेचच जामीन कसा होतो? हे प्रकरण एनआयएला देण्यात आले नाही. यात कोणकोण गुंतले आहे हेही सांगण्यात आले नाही. याचे कारणच हे की बनावट नोट प्रकरणात गुंतलेल्यांना तत्कालीन सरकारचं अभय होतं. या प्रकरणात पुढे काँग्रेस नेता होता असे सांगण्यात आले. मात्र, या प्रकरणाचे बिल काँग्रेसवर फाडण्यात आले. या प्रकरणात काँग्रेस नेता नव्हता, असेही मलिक म्हणाले.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now