IPL Auction 2025 Live

Coronavirus Vaccination: कोरोना व्हायरस लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात 50 वर्षांवरील व्यक्तींना लस दिली जाणार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

राज्यातील विविध जिल्ह्यात लसीकरण सुरु झाले असून प्रथम फ्रंटलाईन वर्कर्स, आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या विरोधातील लस दिली जात आहे.

Health Minister Rajesh Tope | (Photo Credits: ANI)

Coronavirus Vaccination: देशभरासह राज्यात कोरोना व्हारस वरील लसीकरणाची मोहिम सुरु झाली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यात लसीकरण सुरु झाले असून प्रथम फ्रंटलाईन वर्कर्स, आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या विरोधातील लस दिली जात आहे. अशातच आता तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणावेळी 50 वर्षांवरील व्यक्तींना लस दिली जाणाार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. त्यासाठी नोंदणी 1 मार्च पासून होण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्यात लसीकरण सुरु करण्यात आले आहे. लसीकरणासाठी सुद्धा उत्तम प्रतिसाद मिळत असून त्यासाठी नियोजित करण्यात आलेल्या केंद्रात सुद्धा वाढ होत असल्याचे राजेश टोपे यांनी म्हटले आहे. राज्यात दररोज 45 हजारापर्यंत कर्मचाऱ्यांना लस दिली जात आहे. त्याचसोबत कोविन पोर्टलवर सुद्धा 10 लाख 54 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली असल्याचे ही टोपे यांनी म्हटले आहे. त्यापैकी 4 लाख 68 हजार 293 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली गेली आहे.(Coronavirus in Maharashtra: दशलक्ष लोकसंख्या आणि अन्य राज्यांच्या तुलनेत कोरोनाबाबत राज्याची परिस्थिती अतिशय उत्तम; रुग्णसंख्या, मृत्यू दर आणि सक्रिय रुग्ण झाले कमी)

दरम्यान, भारतात 16 जानेवारीपासून कोविड-19 लसीकरणाला  सुरुवात झाली आणि अवघ्या काही कालावधीत कोरोना लस दिलेला भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश ठरला आहे. आरोग्य मंत्रालयाने  दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 57.75 लाखांहून अधिक लाभार्थींना कोविड-19 लस देण्यात आली आहे. लसीकरण्याचा उत्पादनात देखील भारत अग्रेसर असून जवळपासच्या गरजू देशांना लस पुरवण्याचे कामही भारत करत आहे. आतापर्यंत 57,75,322 व्यक्तींना कोरोना व्हायरसची लस देण्यात आली आहे.