Coronavirus Updates: मुंबईतील धारावीत कोरोनाच्या नव्या 12 रुग्णांची भर पडल्याने आकडा 1924 वर पोहचला, महापालिकेची माहिती

त्यामुळे धारावीतल कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 1924 वर पोहचला असून आतापर्यंत 71 जणांचा बळी गेल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे.

प्रतीकात्मक फोटो | (Photo Credits: File Image)

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे येत्या 30 जून पर्यंत लॉकडाऊनचे आदेश कायम राहणार असल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तर महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे येथे कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून येत असल्याने येथे विशेष काळजी घेतली जात आहे. याच दरम्यान आता मुंबईतील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत (Dharavi) आज कोरोनीच्या नव्या 12 रुग्णांची भर पडली असून एका सुद्धा व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही. त्यामुळे धारावीतल कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 1924 वर पोहचला असून आतापर्यंत 71 जणांचा बळी गेल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे.(Covid-19: मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी; धारावीत मागील 7 दिवसात एकाही मृत्यूची नोंद नाही)

धारावीत कोरोनीची परिस्थितीत सुधारणा होत असल्याचे दिसून येत आहे. तर गेल्या काही दिवसांपासून येथे कोरोनामुळे नव्याने एकाही व्यक्तीचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आलेली नाही. धारावीतील कोरोनाबाधित रुग्णांना तेथेच उपचार मिळावेत यासाठी सुद्धा नव्याने एका रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे. राज्यात  लॉकडाऊनच्या Unlock 1 नुसार दुकाने सुरु करण्यासह नागरिकांना आता घराबाहेर पडण्यासाठी वेळा ठरवून दिल्या आहेत. तसेच आजपासून राज्यात धार्मिक स्थळ, ऑफिसे आणि बस सेवा सुरु झाल्या आहेत.(COVID19: कोरोनाबाधित रुग्णांच्या सेवेसाठी Coro-bot नावाचा प्रायोगिक रोबो ठाण्यामध्ये तयार; पाहा संपूर्ण व्हिडिओ)

दरम्यान महाराष्ट्रात रविवारी कोरोनाच्या सर्वाधिक 3007 नव्या रुग्णांची भर पडली असून 91 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 85 हजारांच्या पार गेल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली होती. राज्यात कोरोनाची साखळी अद्याप तुटलेली नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. तसेच नागरिकांनी आता घराबाहेर पडताना सर्वतोपरी काळजी घ्यावी असे सुद्धा आवाहन करण्यात आले आहे.