Coronavirus Update Of Maharashtra: मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक सहित तुमच्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण आहेत? पहा महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी

मागील 24 तासात 841 नवे कोरोनारुग्ण आढळल्याने ही संख्या इतकी वाढली आहे. याबाबत सविस्तर माहिती आणि कोरोनाबाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी आपण आता पाहणार आहोत

Coronavirus in Maharashtra | (Photo credit: archived, edited, symbolic images)

कोरोना व्हायरसचा (Coronavirus) सर्वात मोठा फटका बसलेल्या महाराष्ट्रात आता कोरोना बाधितांची संख्या ही 15 हजाराच्या वर गेली आहे. महाराष्ट्र आरोग्य मंंत्रालयाच्या माहितीप्रमाणे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope)  यांनी सांगितलेल्या आकडेवारीनुसार, मंगळवार 5 मे रात्री 10 वाजेपर्यंत राज्यात एकुण 15,525 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. मागील 24 तासात 841 नवे कोरोनारुग्ण आढळल्याने ही संख्या इतकी वाढली आहे. यापैकी एकूण 2819 रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर 617 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती आणि कोरोनाबाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी आपण आता पाहणार आहोत. BMC: मुंबईत उद्यापासून दारूचे दुकान बंद; केवळ किराणा दुकाने, मेडिकल यांसारख्या जीवनाश्यक वस्तूंचे दुकाने राहणार सुरु

प्राप्त माहितीनुसार, कोरोना बाधितांचा आकडा हा मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक या मुख्य शहरात अधिक असल्याने या शहरांना रेड झोन मध्ये कायम ठेवण्यात आले आहे. तर गोंदिया,गडचिरोली, वाशीम, सिंधुदुर्ग व उस्मानाबाद या पाच जिल्ह्यांनी कोरोनावर संपूर्ण मात केली असल्याने त्यांना ग्रीन झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. राज्यात ऑरेंज झोन मध्ये सध्या 16 जिल्हे आहेत. तुम्ही राहत असणारा जिल्हा कोणत्या झोन मध्ये येतो हे जाणुन घेण्यासाठी ईथे क्लिक करा.

कोविड-19 महाराष्ट्र राज्याची जिल्हा/मनपा निहाय सध्या स्थिती 
अ.क्र. जिल्हा/मनपा बाधित रुग्ण मृत्यू
1 मुंबई मनपा 9945 387
2 ठाणे 82 2
3 ठाणे मनपा 466 8
4 नवी मुंबई मनपा 415 4
5 कल्याण डोंबिवली मनपा 227 3
6 उल्हासनगर मनपा 12 0
7 भिवंडी निजामपूर मनपा 20 2
8 मीरा भाईंदर 182 2
9 पालघर 31 1
10 वसई विरार मनपा 161 4
11 रायगड 56 1
12 पनवेल मनपा 107 2
ठाणे मंडळ एकूण 11,704 416
1 नाशिक 21 0
2 नाशिक मनपा 27 0
3 मालेगाव मनपा 361 12
4 अहमदनगर 44 2
5 अहमदनगर मनपा 9 0
6 धुळे 8 2
7 धुळे मनपा 24 1
8 जळगाव 47 11
9 जळगाव मनपा 11 1
10 नंदुरबार 19 1
नाशिक मंडळ एकूण 571 30
1 पुणे 106 4
2 पुणे मनपा 1836 112
3 पिंपरी-चिंचवड मनपा 123 3
4 सोलापूर 3 1
5 सोलापूर मनपा 127 6
6 सातारा 79 2
पुणे मंडळ एकुण 2271 128
1 कोल्हापूर 9 1
2 कोल्हापूर मनपा 6 0
3 सांगली 32 0
4 सांगली मिरज कुपवाड मनपा 2 1
5 सिंधुदुर्ग 3 1
6 रत्नागिरी 10 1
कोल्हापूर मंडळ एकुण 62 4
1 औरंगाबाद 3 0
2 औरंगाबाद मनपा 337 11
3 जालना 8 0
4 हिंगोली 55 0
5 परभणी 1 1
6 परभणी मनपा 1 0
औरंगाबाद मंडळ एकूण 405 12
1 लातूर 19 1
2 लातूर मनपा 0 0
3 उस्मानाबाद 3 0
4 बीड 1 0
5 नांदेड 3 0
6 नांदेड मनपा 28 2
लातूर मंडळ एकूण 54 3
1 अकोला 7 1
2 अकोला मनपा 56 5
3 अमरावती 2 1
4 अमवरावती मनपा 58 9
5 यवतमाळ 92 0
6 बुलढाणा 24 1
7 वाशीम 1 0
अकोला मंडळ एकूण 241 17
1 नागपूर 2 0
2 नागपूर मनपा 179 2
3 वर्धा 0 0
4 भंडारा 1 0
5 गोंदिया 1 0
6 चंद्रपूर 1 0
7 चंद्रपूर मनपा 3 0
8 गडचिरोली 0 0
नागपूर मंडळ एकूण 187  2
1 इतर राज्य 30 5
एकूण 15,525 617 

 

दुसरीकडे देशात सुद्धा कोरोना बाधितांंची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, सद्य घडीला देशात 49,391 कोरोना रुग्ण आढळले असून यापैकी 33,514 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर 14,182 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत कोरोना व्हायरस संक्रमित 1694 रुग्णांचा मृत्यू देशात झाला आहे .