Coronavirus Update In Maharashtra: मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, सहित तुमच्या जिल्ह्यात किती COVID19 रुग्ण? पहा महाराष्ट्रातील कोरोना बाधित रुग्णांची जिल्हानिहाय आकडेवारी

महाराष्ट्रात मागील 24 तासात कोरोनाचे नवे 1230 रुग्ण आढळून आल्याने आता राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 23,401 वर पोहचला आहे. महाराष्ट्रातील तुम्ही राहत असणाऱ्या अन्य जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या (Last Updated 11 th May 10pm) जाणून घ्या.

Coronavirus In Maharashtra | (Photo credit: archived, edited, symbolic images)

Coronavirus In Maharashtra: महाराष्ट्रात मागील 24 तासात कोरोनाचे नवे 1230 रुग्ण आढळून आल्याने आता राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 23,401 वर पोहचला आहे. यामधल्या दिलासादायक बातमी म्हणजे कालच्या एकाच दिवसात कोरोनावर मात केलेल्या 587 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 4, 786 इतकी आहे तर दुर्दैवाने कोरोनाच्या बळींचा आकडा 868 वर पोहचला आहे. यापैकी मुंबई (Mumbai) आणि पुणे (Pune) शहरात सर्वाधिक वेगाने कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई आणि पुणे येथे कंटेनमेंट झोन (Containment Zone) बनवण्यात आले असून याठिकाणी लॉक डाऊनचे (Lockdown) नियम अधिक कठोरपणे लागू केलेले आहेत. पुण्यातील 69 कंटेनमेंट झोन मध्ये तर 11 मे ते 17 मे या सहा दिवसात मेडिकल सेवा सोडून सर्व काही बंद ठेवलेले आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील तुम्ही राहत असणाऱ्या अन्य जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या (Last Updated 11 th May 10pm) जाणून घ्या.

मागील काही दिवसात रत्नागिरी, सिंधुदुर्ग,सहित कोकणातील बरेच भाग हे कोरोना मुक्त होण्याच्या मार्गावर होते, मात्र आता या ठिकाणी पुन्हा कोरोनाच्या रुंगांची संख्या वाढल्याने छोटा सुद्धा वाढली आहे. कोरोना रुग्णांच्या आकडेवारीनुसार राज्याचे तीन वेगळ्या झोन मध्ये विभाजन करण्यात आले आहे. यानुसार तुम्ही राहत असणारा जिल्हा हा रेड, ग्रीन, ऑरेंज झोन पैकी नेमका कोणत्या झोन मध्ये येतो हे जाणून घेण्यासाठी क्लिक करा.

महाराष्ट्रातील कोरोना संक्रमितांची जिल्हानिहाय आकडेवारी:

अ.क्र. जिल्हा/मनपा बाधित रुग्ण मृत्यू
1 मुंबई मनपा 14, 521 528
2 ठाणे 125 2
3 ठाणे मनपा 927 10
4 नवी मुंबई मनपा 898 4
5 कल्याण डोंबिवली मनपा 366 3
6 उल्हासनगर मनपा 30 0
7 भिवंडी निजामपूर मनपा 32 2
8 मीरा भाईंदर 214 2
9 पालघर 37 2
10 वसई विरार मनपा 249 10
11 रायगड 123 1
12 पनवेल मनपा 139 2
ठाणे मंडळ एकूण 17, 661 566
1 नाशिक 60 0
2 नाशिक मनपा 40 0
3 मालेगाव मनपा 595 34
4 अहमदनगर 54 3
5 अहमदनगर मनपा 9 0
6 धुळे 9 3
7 धुळे मनपा 45 3
8 जळगाव 145 12
9 जळगाव मनपा 35 7
10 नंदुरबार 22 2
नाशिक मंडळ एकूण 1015 64
1 पुणे 166 5
2 पुणे मनपा 2478 149
3 पिंप्री-चिंचवड मनपा 147 4
4 सोलापूर 9 0
5 सोलापूर मनपा 287 16
6 सातारा 121 2
पुणे मंडळ एकुण 3206 176
1 कोल्हापूर 13 1
2 कोल्हापूर मनपा 6 0
3 सांगली 33 0
4 सांगली मिरज कुपवाड मनपा 4 1
5 सिंधुदुर्ग 6 0
6 रत्नागिरी 42 2
कोल्हापूर मंडळ एकुण 104 4
1 औरंगाबाद 93 0
2 औरंगाबाद मनपा 491 14
3 जालना 14 0
4 हिंगोली 60 0
5 परभणी 1 1
6 परभणी मनपा 1 0
औरंगाबाद मंडळ एकूण 660 15
1 लातूर 26 1
2 लातूर मनपा 5 0
3 उस्मानाबाद 3 0
4 बीड 1 0
5 नांदेड 4 0
6 नांदेड मनपा 41 4
लातूर मंडळ एकूण 80
1 अकोला 18 1
2 अकोला मनपा 144 10
3 अमरावती 5 2
4 अमवरावती मनपा 78 11
5 यवतमाळ 97 0
6 बुलढाणा 25 1
7 वाशीम 1 0
अकोला मंडळ एकूण 368 25
1 नागपूर 2 0
2 नागपूर मनपा 257 2
3 वर्धा 1 1
4 भंडारा 1 0
5 गोंदिया 1 0
6 चंद्रपूर 1 0
7 चंद्रपूर मनपा 3 0
8 गडचिरोली 0 0
नागपूर मंडळ एकूण 266 3
1 इतर राज्य 41 10
एकूण 23,401 868

LOCKDOWN: अभिनेता Sonu Sood मजूरांसाठी आला धावून; परप्रांतीयांसाठी केली घरी पोहचवण्याची सोय - Watch Video

दरम्यान, देशातील रुग्णांच्या संख्येने 70 हजारांच्या टप्पा पार केला आहे. गेल्या 24 तासात देशात 3604 नवे कोविड-19 आढळले असून एकूण संख्या 70,756 इतकी झाली आहे. सद्य स्थितीत राज्यात एकूण 46,008 रुग्णांवर उपचार सुरु असून 22,455 रुग्णांना डिस्चार्ज मिळाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तर आतापर्यंत 2293 रुग्ण दगावल्याची माहिती मिळत आहे

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now