Coronavirus Update: राज ठाकरे यांचे निवासस्थान 'कृष्णकुंज'वर कोरोनाने पुन्हा दिली धडक, आणखी एक कामगार कोविड-19 संक्रमित

तिघेही वाहन चालक आहेत. त्यापैकी दोन जणांची गेल्या आठवड्यात कोविड-19 पॉझिटिव्ह टेस्ट आढळली होती तर, तिसर्‍याची शुक्रवारी रात्री विषाणूची खात्री झाली

MNS Chief Raj Thackeray | (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मुंबईतील निवास स्थानी तीन कामगारांना कोरोना व्हायरससाठी (Coronavirus) सकारात्मक लागण झाल्याचे समोर आले आहे. तिघेही वाहन चालक आहेत. त्यापैकी दोन जणांची गेल्या आठवड्यात कोविड-19 पॉझिटिव्ह टेस्ट आढळली होती तर, तिसर्‍याची शुक्रवारी रात्री विषाणूची खात्री झाली आणिक सध्या तिघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दादरच्या शिवाजी पार्क (Shivaji Park) परिसरात राज यांचे 'कृष्णकुंज', हे निवासस्थान आहे. दादर, माहीम आणि धारावी हा परिसर पालिकेच्या जी नॉर्थ या वॉर्डात येतो. काही दिवसांपूर्वी या वॉर्डमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण आढळले होते. दरम्यान, कोणताही दिलासा न दाखविता महाराष्ट्रातील कोविड-19 प्रकरणांना सुखरावाई उच्चांक गाठला. शुक्रवारी एकूण 5,024 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली तर राज्यातील मृत्यूची संख्या 7,000 च्या आकड्यावर गेली असून ती 7,106 वर पोचली, असे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. (मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज वरील सुरक्षा रक्षकांची कोरोना व्हायरसवर मात)

दरम्यान, यापूर्वी राज ठाकरे यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या दोन पोलिस कोरोना बाधित झाले होते. मात्र, कोरोनावर मात करून ते पुन्हा कामावर रुजू झाले. काही दिवसांपूर्वी कृष्णकुंजपासून काही अंतरावर असणाऱ्या शिवसेना भवनातही करोनाचा शिरकाव झाला होता, ज्यानंतर शिवसेना भवनात सॅनिटायझेशन प्रक्रीया करण्यात आली होती आणि एका आठवड्यासाठी शिवसेना भवन बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

दुसरीकडे, भारतात कोरोना संक्रमितांचा आकडा 5 लाखाच्या पार गेला आहे, तर महाराष्ट्रात आजवर सर्वाधिक 1,52,765 कोरोना रुग्ण आढळले आहेत. राज्यातील मृतांचा आकडा 7 हजाराच्या वर पोहचला आहे तर रिकव्हरी रेट 52.25 इतका आहे. राज्यात मुंबई शहरात सर्वाधिक कोरोनासंक्रमितांची नोंद झाली आहे. मुंबईमध्ये 72 हजाराच्या वर कोरोना रुग्नांची नोंद झाली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif