Coronavirus: महाराष्ट्रात पुन्हा उसळी, गेल्या 24 तासात 21,029 नागरिकांना कोरोना व्हायरस संसर्ग, 479 जणांचा मृत्यू

राज्यातील मृत्यू दर हा 2.68% इतका आहे. राज्यात आतापर्यंत 61,06,787 नमुने घेण्यात आले. त्यापैकी 34,457 जणांचा अहवाल कोरोना व्हायरस पॉझिटीव्ह आला. राज्यातील 18,75,424 नागरिक होम क्वारंटाईन आहेत. तर 34,457 नागरिक संस्थात्मक क्वारंटीन आहेत.

Coronavirus in Maharashtra | (Photo credit: archived, edited, symbolic images)

राज्यातील कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमितांच्या रुग्णसंख्येने आज पुन्हा एकदा उसळी घेतली. गेल्या 24 तास आज 21,029 नागरिकांना कोरोना व्हायरस (Covid 19) संसर्ग झाल्याचे आढळून आले. कोरोना संक्रमित झालेल्या मात्र उपचारानंतर बरे वाटू लागल्याने आणि प्रकृतीत सुधारणा झाल्याने 19,476 नागरिकांना रुग्णालयातून सुट्टी (डिस्चार्ज) देण्यात आला आहे. तर 479 कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने (Maharashtra State Health Department) दिली आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाने माहिती देताान पुढे सांगितले की, राज्यातील एकूण कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या 12,63,799 इतकी झाली आहे. त्यापैकी उपचार घेऊन बरे वटल्याने आणि प्रकृती सुधारणा झाल्याने 9,56,030 जणांना रुग्णालयातून सुट्टी (डिस्चार्ज) देण्यात आला आहे. आतापर्यंत कोरोना व्हायरस संक्रमित 33,886 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 2,73,477 रुग्णांवर रुग्णालायांमध्ये उपचार सुरु आहेत. या सर्वांची संख्या एकूण 12,63,799 इतकी आहे.

राज्यातील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांचे बरे होण्याचे सरासरी प्रमाण हे 75.65% इतके आहे. राज्यातील मृत्यू दर हा 2.68% इतका आहे. राज्यात आतापर्यंत 61,06,787 नमुने घेण्यात आले. त्यापैकी 34,457 जणांचा अहवाल कोरोना व्हायरस पॉझिटीव्ह आला. राज्यातील 18,75,424 नागरिक होम क्वारंटाईन आहेत. तर 34,457 नागरिक संस्थात्मक क्वारंटीन आहेत. (हेही वाचा, धक्कादायक! Coronavirus काळात मार्च ते जून 2020 दरम्यान 1 कोटीहून अधिक Migrant Labourers पायी चालत परतले घरी; यापैकी मृत्यूचा डेटा सरकारकडे नाही)

देशातील कोरोना व्हायरस संक्रमितांची एकूण आकडेवारी पाहात ती 56,46,011 इतकी आहे. यात रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या 26,83,377 इतकी आहे. आतापर्यंत 90020 जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत देशभरात एकूण 45,87,614 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.