Coronavirus: जसलोक हॉस्पिटल मधील 31 परिचारिका आणि 5 डॉक्टरांना कोरोनाची लागण
दक्षिण मुंबईतील (South Mumbai) जसलोक हॉस्पिटल (Jaslok Hospital) मध्ये 31 नर्स आणि 5 डॉक्टरांना कोरोनाची लागण (Coronavirus Positive) झाल्याचे समजत आहे.
दक्षिण मुंबईतील (South Mumbai) जसलोक हॉस्पिटल (Jaslok Hospital) मध्ये 31 नर्स आणि 5 डॉक्टरांना कोरोनाची लागण (Coronavirus Positive) झाल्याचे समजत आहे. जसलोक हे मुंबईतील मोठे आणि महत्वाचे रुग्णालय असून इथे मागील अनेक दिवसांपासून कोरोना रुग्णांवर उपचार होत आहेत, अशावेळी डॉक्टरांच्या सुरक्षेच्या बाबत काहीशी हेळसांड होत असल्याची तक्रार देखील काही दिवसांपासून ऐकू येत होती. किंबहुना यामुळेच आता तब्बल 36 वैद्यकीय कर्मचाऱयांना कोरोनाची लागण झाली आहे. दुसरीकडे महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाबाधीतांची संख्या 3 हजार 648 वर पोहचली आहे. यात मागील 24 तासात मुंबईत (Mumbai) 184 तर, पुणे (Pune) शहरात 78 नवे रुग्ण आढळून आले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच जसलोक हॉस्पिटलमधून 150 स्वॅप टेस्ट घेण्यात आल्या आहेत. यावेळी ब्लॅडर कॅन्सरचा एक रूग्ण ज्याला डायलिसिसची गरज होती तो कोरोना बाधित असल्याचं समोर आलं होतं या रूग्णाच्या संपर्कात आलेली नर्स देखील कोरोनाबाधित असल्याचे पुढे समजले होते. यापार्श्वभूमीवर जसलोकमध्ये ओपीडी कक्ष आणि नवे रूग्ण भरती करण्याचं थांबवल्याची माहिती समोर आली होती. COVID-19: मुंबई मधील एका रुग्णालयातील 10 कर्मचा-यांना कोरोनाची लागण
दरम्यान, देशभरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत मागील 24 तासात 1,334 नवी प्रकरणांची भर पडली आहे तर याशिवाय 27 नवे बळी गेले आहेत. सद्य घडीला देशात कोरोना बाधित असे 12 हजार 696 रुग्ण आहेत, याशिवाय 507 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला असून 2231 रुग्णांना बरे करण्यात वैद्यकीय विभागला यश आले आहे. या सर्व आकडेवारीनुसार देशातील रुग्णांची संख्या ही 15 हजार 712 वर पोहचली आहे.