Coronavirus Outbreak: मास्कचा वापर कसा, केव्हा, कुठे करावा? जाणून घ्या संपूर्ण माहिती
आता मास्क घालणे बंधनकारक करण्यात आल्याने मास्कचा वापर नेमका कसा करावा याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्यातील कोरोना बाधितांची संख्या दिवसागणित वाढत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सरकार आवश्यक प्रयत्न करत आहे. कोरोना रुग्णांसाठी विशेष रुग्णालयांची सोय करण्यात आली असून घरोघरी जावून नागरिकांची तपासणी केली जात आहे. तसंच कोरोनाचे रुग्ण आढळलेल्या ठिकाणांचे निर्जंतुकीकरण करण्यात येत असून ती ठिकाणं कंटेनमेंट झोन (Containment Zone) म्हणून घोषित करण्यात आली आहेत. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यास काही प्रमाणात नक्कीच यश येईल. विशेष म्हणजे लॉकडाऊनचा कालावधी 30 एप्रिल पर्यंत वाढवण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या या पुढील टप्प्यात कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी नियम अधिक कडक करण्यात येतील. तर फारसा प्रादुर्भाव नसलेल्या ठिकाणी नियमांमध्ये काही अंशी शिथिलथा देण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. मात्र पुढच्या टप्प्यातील नियम, व्यवस्था याबाबतची माहिती काही दिवसांतच मुख्यमंत्र्यांकडून देण्यात येईल.
कोरोनाचा आकडा शुन्यावर आणण्यासाठी सरकार विशेष नियमांची अंमलबजावणी करत असून नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचे कामही सतत सुरु आहे. आता मास्क घालणे बंधनकारक करण्यात आल्याने मास्कचा वापर नेमका कसा करावा याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मास्क वापराबाबत सर्वसामान्य जनतेच्या मनात अनेक प्रश्न असतात. तसंच मास्कच्या चुकीच्या वापरामुळे धोका अधिक वाढू शकतो. हीच बाब लक्षात घेत प्रशासनाकडून मास्क कधी, कुठे, कसा वापरायचा याबाबत संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. (तुमच्या जिल्ह्यात कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या किती? महाराष्ट्राचा एकूण आकडा किती?)
MAHARASHTRA DGIPR Tweet:
कोरोनापासून आपले संरक्षण करण्यासाठी 'मीच माझा रक्षक' हा कानमंत्र आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जनतेला दिला आहे. त्यानुसार आपण काळजी घेतल्यास कोरोना विरुद्धची लढाई आपण नक्कीच जिंकू. तसंच तुम्ही 'खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेतो' असं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारी घेण्याचं महत्त्व अधोरेखित केलं आहे.