Coronavirus: मुंबई, पुणे, सांगली, नागपूर, अहमदनगर यांसह राज्यातील इतर शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या किती? घ्या जाणून

त्यापैकी 162 जणांची प्रकृती उपचारानंतर सुधारली असल्याने आणि त्यांना सध्या आराम वाटत असल्याने घरी सोडण्यात आले आहे. दे

Coronavirus | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

मुंबई (Mumbai) शहरासह राज्यातील कोरोना व्हायरस (Coronavirus) बाधितांची संख्या आता 490 इतकी झाली आहे. यात मुंबई शहरातील नव्याने नोंद झालेल्या 43 रुग्णांचाही समावेश आहे. नव्या रुग्णांसह एकट्या मुंबई शहरातील रुग्णांची संख्या 278 इतकी झाली आहे. मुंबई शहरासह राज्यातील इतर शहरं आणि काही प्रमाणात ग्रामिण भागातही कोरोना व्हायरस संसर्ग झाल्याचे रुग्ण आढळून आले आहेत. मुंबई शहरासह राज्यातील विविध ठिकाणी कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या खाली तक्त्यात दिली आहे. दरम्यान, राज्यात आज दिवसभरात कोरोना बाधित 67 रुग्णांची भर पडली. एकूण रुग्णांपैकी 50 जणांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 26 जणांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, देशातील कोरोना व्हायरस (Coronavirus) बाधितांचा विचार करता ती आकडेवारीही मोठी आहे. कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची देशातील एकूण संख्या संख्या 2547 इतकी आहे. त्यापैकी 162 जणांची प्रकृती उपचारानंतर सुधारली असल्याने आणि त्यांना सध्या आराम वाटत असल्याने घरी सोडण्यात आले आहे. देशभरात आतापर्यंत कोरना लागन झालेल्या 62 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या उपचार घेत असलेल्या कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या 2322 इतकी आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय (Ministry of Health) आणि कुटुंब कल्याण विभाग (Family Welfare) अशा दोघांनी ही माहिती संयुक्तरित्या दिली. (हेही वाचा, महाराष्ट्रातील 7 कोरोना बाधित रुग्ण हे दिल्लीतील तबलिगी जमातीच्या कार्यक्रमात होते सहभागी- राज्य आरोग्य विभाग)

राज्यात कोणत्या शहरात कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या किती?

महाराष्ट्रातील जिल्हा व मनपा निहाय कोरोना व्हायरस बाधित रुग्णसंख्या, मृत्यू

(*आकडेवारी 3 एप्रिल 2020 पर्यंतची)

अ.नं. जिल्हा/मनपा रुग्ण संख्या मृत्यू
1 मुंबई 278 18
2 पुणे (शहर व ग्रामीण) 70 02
3 सांगली 25 00
4 मुंबई वगळून ठाणे मंडळातील मनपा व जिल्हे 55 04
5 नागपूर 06
6 अहमदनगर 20 00
7 बुलढाणा 05 01
8 यवतमाळ 04 00
9 सातारा, औरंगाबाद प्रत्येकी 03 0
10 कोल्हापूर, रत्नागिरी प्रत्येकी 02 00
11 सिंधुदुर्ग, गोंदिया, नाशिक, उस्मानाबाद, वाशिम, जळगाव प्रत्येकी 1 1 (जळगाव)
एकूण 490 26

मुंबई महापालिका ट्विट

धक्कादायक म्हणजे हे वृत्त लिहिण्यापूर्वी काहीच वेळ हाती आलेल्या माहितीनुसार, न्यूयॉर्क शहरात कोरना व्हायरस बाधितांची संख्या 102,863 इतकी आहे. तर कोरनाचा बळी ठरलेल्यांची संख्या 2,935 इतकी आहे. न्यू यॉर्कमध्ये आज दिवसभरात 10,482 रुग्णांची नोंद झाली. तर 562 जाणांचा मृत्यू झाला आहे.