Coronavirus: मुंबईत 50 टक्के झोपडपट्ट्यांसह Containment Zone चा आकडा 1 हजाराच्या पार
त्यामुळे सरकारने लॉकडाउनचे आदेश येत्या 3 मे पर्यंत कायम ठेवले आहेत. तसेच राज्याची रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये विभागणी केली आहे.
देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे सरकारने लॉकडाउनचे आदेश येत्या 3 मे पर्यंत कायम ठेवले आहेत. तसेच राज्याची रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये विभागणी केली आहे. त्याचसोबत कोरोनाच्या हॉटस्पॉट ठिकाणांना कंन्टेंटमेंड झोन म्हणून घोषित केले आहे. याच दरम्यान आता मुंबईत कन्टेंटमेंट झोनचा आकडा 1 हजारांच्या पार गेला आहे. यामध्ये 50 टक्के झोपडपट्ट्यांचा समावेश असल्याची माहिती नागरी अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. त्याचसोबत 14 दिवसात एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून न आल्यास त्या परिसराला कंन्टेंटमेंट झोनमधून वगळण्यात येत असल्याचे ही त्यांनी म्हटले आहे.
मुंबई महापालिकेने 1459 कंन्टेंटमेंट झोन घोषित केले होते. त्यापैकी 331 जणांना त्यामधून वगळण्यात आले आहे. मात्र 1128 या कन्टेंटमेंट झोनमध्ये 50 टक्के झोपडपट्ट्यांचा आणि रेड झोनचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे अशा ठिकणी लॉकडाउनचे नियम अधिक कठोर करण्याची अधिक गरज आहे. महापालिकेने मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कंन्टेटमेंट झोनची वर्गवारी करण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी 77 वर तो आकडा होता पण रुग्णांची संख्या वाढली गेल्याचे दिसून आले. झोपडपट्टी आणि दाटीवाटीचे क्षेत्र कंन्टेंटमेंट झोन घोषित करण्यात यावे असे वॉर्ड अधिकाऱ्यांनी सांगितले होते. त्याचसोबत पोलिसांनी सुद्धा या ठिकाणी लॉकडाउनचे नियम अधिक कठोर करावेत असे म्हटले होते.(महाराष्ट्रात 3 मे नंतर कोरोना व्हायरस लॉकडाऊनमध्ये रेड, ऑरेंज, ग्रीन झोननुसार मोकळीक मिळू शकते: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संकेत)